JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गर्भावस्थेत मूत्रमार्गातील संसर्ग टाळण्यासाठी काय करावं?

गर्भावस्थेत मूत्रमार्गातील संसर्ग टाळण्यासाठी काय करावं?

गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेली असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पावसाळ्याचे दिवस गरमीपासून सुटका देतात, पण पावसाळ्यासोबत अनेक आजार आणि अॅलर्जी त्रास देतात. वर्षातल्या या मोसमात संक्रमणाचा त्रास होणं हे स्वाभाविक आहे. लहान मुलं, वडीलधारी मंडळी आणि गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी. विशेषतः गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेली असते. म्हणून अन्य लोकांपेक्षा त्यांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. संक्रमण आणि अॅलर्जी याशिवाय, गर्भवती महिलांना या काळात मूत्रमार्गातील संसर्ग अर्थात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स (पीटीआई) पासून स्वतःला सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. myupchar.com च्या एम्सशी संबंधित डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच मूत्रमार्गाचा संसर्ग सूक्ष्मजीवाणूंमुळे होत असतो. अधिकतर यूटीआय जीवाणूंमुळे होतात पण कधी कधी हे फंगस किंवा विषाणूंमुळे पण होतात. यूटीआई मूत्रमार्गात कुठेही होऊ शकतं. मूत्रमार्ग म्हणजे किडनी, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रमार्ग इत्यादी. जर महिला गर्भावस्थेच्या सहा ते 24 व्या आठवड्यात असेल तर तिला यूटीआई होण्याचा जास्त धोका असतो. याचं कारण म्हणजे या काळात मूत्रमार्गामध्ये अनेक बदल होत असतात. गर्भाशय मूत्राशयाच्या वरच्या भागात असतं. जेव्हा गर्भाशय वाढतं तेव्हा त्याचं वाढते वजन मूत्रमार्गाला संकुचित करतं त्याने अवरोध निर्माण होतो. यामुळे  गर्भावस्थेच्या काळात यूटीआईचा धोका वाढतो. हे वाचा -  बाळाचं आजारांपासून संरक्षणासाठी प्रेग्नन्सीमधील लसीकरण; कोणत्या लशी महत्त्वाच्या यूटीआईची सामान्य लक्षणं म्हणजे लघवी करताना वेदना होणं. महिलांना थंडी वाजणं, ताप, घाम, थकवा, शरीर आखडणं आणि ओटीपोटात दुखणं या लक्षणांचा पण अनुभव येतो. कधी कधी लघवीतून रक्तही जातं. पुन्हा पुन्हा लघवीला जावंसं वाटणं आणि लघवीला खूप वास येणं हेदेखील मूत्रमार्गाच्या संसर्गाचे संकेत आहेत. यापैकी कुठलीही लक्षणं दिसली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करायला हवा आणि त्यांचा सल्ला घ्यायला हवा. जर त्यावर वेळीच उपचार नाही केले तर मात्र किडनीचा संसर्ग होऊ शकतो. हे गर्भातील बाळासाठी त्रासदायकपण होऊ शकतं. असं झालं तर नियोजित वेळेपूर्वी बाळाचा जन्म होणं किंवा कमी वजनाचं बाळ होणं अशा घटना होतात. पावसाळ्यात गर्भवती महिलांनी यूटीआईपासून सुरक्षित राहण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्यावी : लघवी अडवून ठेऊ नका जर लघवीला झाली तर थांबून राहू नका, लगेचच जा. लघवी थांबवून ठेवणं धोकादायक असतं. त्याने जीवाणू वाढतात आणि यूटीआई होण्याची शक्यता वाढते. सार्वजनिक शौचालया****चा उपयोग टाळा जर गर्भवती असाल तर सार्वजनिक शौचलयांमध्ये जाणं टाळा, तिथे जीवाणू असण्याची जास्त शक्यता असते. जर गरज पडलीच तर टॉयलेट सीटला सॅनिटाइजरने स्वच्छ करण्याची सावधगिरी बाळगा. जीवाणूंमुळे संसर्ग होऊ नये म्हणून लघवी केल्यानंतर आपल्या अवयवांना स्वच्छ पाण्याने धुवा. भरपूर पाणी प्या हायड्रेट राहण्यासाठी खूप पाणी प्या. myupchar.com च्या डॉ. आकांक्षा मिश्रा यांनी सांगितलं, जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. कॅफिनयुक्त पेय घेऊ नका त्याने मूत्राशयामध्ये जळजळ होते. पौष्टिक आहार घ्या झिंक आणि जीवनसत्व सी युक्त पदार्थ भरपूर खा. त्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि जीवाणूंशी लढण्याची शक्ती वाढेल. स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, आंबट फळे, मोड आलेले धान्य, बिया, शेंगा, आणि अंडे हेसुद्धा चांगले पर्याय आहेत. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखर खाणं टाळा. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गर्भधारणा न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या