JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Travel Tips : कमी खर्चात प्रवासाचा भरपूर आनंद घ्यायचाय? तर फॉलो करा या 5 टिप्स

Travel Tips : कमी खर्चात प्रवासाचा भरपूर आनंद घ्यायचाय? तर फॉलो करा या 5 टिप्स

प्रवासाला जाण्यापूर्वी आपण योग्य नियोजन केले तर कमी बजेटमध्येही प्रवासाचा भरपूर आनंद घेऊ शकता. कोणत्याही ठिकाणी फिरायला जाताना पैशांची गरज तर असतेच. मात्र त्याहीपेक्षा त्या पैशांचे योग्य नियोजन करून खर्च काढणे जास्त गरजेचे असते. जर तुम्ही तुमच्या प्रवासाची व्यवस्थित योजना केली असेल. तर तुम्ही निश्चितच कमी बजेटमध्येही प्रवासाचा आनंद सहज घेऊ शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 एप्रिल : सुट्ट्यांमध्ये प्रवास करायचा असला की सर्वात महत्वाचे असते महिन्याचे बजेट. महिन्याच्या बजेटबरोबर त्याचसोबत हजारोंचा खर्च आपल्या मनात घुमू लागतो. वाहतूक, खाणेपिणे, हॉटेल, खरेदी इत्यादी खर्चाचा विचार करून बरेच लोक फिरायला जाण्याचा बेत रद्द करतात. अशा परिस्थितीत काही तातडीच्या कामासाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस बाहेर कुठेतरी फिरावे लागले तर तुमचे संपूर्ण बजेट बिघडते. प्रवासापूर्वी योग्यप्रकारे नियोजन केल्यास कमी बजेटमध्येही प्रवासाचा आनंद लुटता येईल. एखाद्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी पैशांपेक्षा अधिक बुद्धिमत्ता आवश्यक असते. कोणत्याही ठिकाणी फिरायला जाताना पैशांची गरज तर असतेच. मात्र त्याहीपेक्षा त्या पैशांचे योग्य नियोजन करून खर्च काढणे जास्त गरजेचे असते. जर तुम्ही तुमच्या प्रवासाची व्यवस्थित योजना केली असेल. तर तुम्ही निश्चितच कमी बजेटमध्येही प्रवासाचा आनंद सहज घेऊ शकता. सर्वप्रथम एक योजना आखा जर तुमच्याकडे मर्यादित बजेट आणि वेळेची कमतरता असेल तर सर्व प्रथम योजना तयार करा. त्यासाठी तुमचा येण्या-जाण्याचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा संपूर्ण खर्च नोटबुकवर लिहा. यावरून तुम्हाला तिथल्या खर्चाची कल्पना येईल. यानुसार तुम्ही पैसे जवळ ठेवा आणि वेळेचीही नियोजन करा. यामुळे तुमचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होईल.

तुम्हालाही बध्दकोष्ठतेचा त्रास आहे का? तर आहारात करा ‘आळशीच्या बियां’चा समावेश, मिळेल आराम

ऑफ सीझन प्रवास करा कोणत्याही पर्यटनस्थळी जर तुम्ही ऑफ-सीझनमध्ये प्रवास केला तर तुम्हाला प्रवासाची तिकिटे, राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची सोय सर्वकाही कमी किमतीत होईल. तसेच तुम्हाला त्या पर्यटनस्थळी जास्त गर्दीदेखील मिळणार नाही आणि तुम्ही तुमची ट्रिप मनसोक्त एन्जॉय करू शकाल.

होमस्टे किंवा हॉस्टेलमध्ये रहा जर तुम्ही मित्र मंडळी मिळून प्रवास करत असाल किंवा तुमच्यासोबत तुमची फॅमिली नसेल. तर तुम्ही हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा होम स्टे किंवा हॉस्टेलमध्ये राहू शकता. येथे तुम्हाला स्वस्त किमतीत स्टे करता येईल. जर तुम्ही इथे रूम शेअर केली तर ती आणखी स्वस्त असू शकते. ही माहिती तुम्हाला ऑनलाइन वेबसाइट्सवर मिळू शकते. जर तुमचे कोणी नातेवाईक किंवा मित्र तिथे राहत असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत रात्र घालवू शकता. यामुळे तुमच्या खर्चात फरक पडेल आणि तुमचे पैसे वाचतील.

Diet For Nails: सुंदर, आकर्षक नखांसाठी आहारात या गोष्टी असाव्यात; तुटणार नाहीत, खुलेल हाताचं सौंदर्य

संबंधित बातम्या

सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करा प्रवासादरम्यान ये-जा करण्याचा खर्च सर्वाधिक असतो. अशा परिस्थितीत तेथे जाण्याचे सर्व पर्याय तुम्ही आधीच शोधावे आणि मग ठरवावे की कोणती सार्वजनिक वाहतूक तुमच्यासाठी स्वस्त आहे. जेव्हा तुम्ही स्थानावर पोहोचता तेव्हा कॅब, टॅक्सी घेण्याऐवजी स्थानिक सार्वजनिक वाहतूक शोधा आणि त्यानेच प्रवास करा. हा प्रवास स्वस्तात होईल. ढाब्यावर जेवण करा खर्च वाचवण्यासाठी रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये बसण्याऐवजी स्थानिक ढाब्यांवर जेवण किंवा नाश्ता करा. यामुळे तुमच्या खिशावर अधिक भार पडणार नाही. अशाप्रकारे तुमच्या प्रवासाचे आणि पैशांचे योग्य नियोजन करून तुम्ही फिरायला जाऊ शकता. आणि मनमुराद आनंद लुटू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या