दिल्ली, 12 मार्च: ट्रान्सजेंडर (Transgender Model beauty content) व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा व्यक्तींकडे (LGBT) पाहण्याचा अन्य व्यक्तींचा दृष्टिकोनही काहीसा नकारात्मक असतो; मात्र अलीकडच्या काळात संघर्ष करून ट्रान्सजेंडर व्यक्तीही यशस्वी झाल्याचं दिसत आहे. भारतातली एकमेव मिस ट्रान्सवुमन (Miss India Transwoman Beautyqueen), इंडिया ब्युटी पीजंटची ब्रँड अॅम्बेसिडर, अभिनेत्री आणि मॉडेल नव्या सिंगची (Transgender model actress Navya Singh struggle story) कहाणी अशीच काहीशी आहे. नव्याला तिच्या आयुष्यात यश, सन्मान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला; मात्र तिनं हार मानली नाही. आज ती एक यशस्वी मॉडेल (Transgender Model Navya Singh) आहे. तिच्या जीवनप्रवासाची कहाणी सांगणारं वृत्त ` दैनिक भास्कर `ने प्रसिद्ध केलं आहे. 12 व्या वर्षी झाली स्त्रीपणाची जाणीव बिहारमधल्या (Bihar Katihar) कटिहारमधल्या एका शीख कुटुंबात नव्या सिंगचा जन्म झाला. तिचं शरीर पुरुषाचं असलं, तरी मनातल्या भावना एखाद्या महिलेप्रमाणे होत्या. या वेगळेपणाची जाणीव होताच, तिच्या संघर्षमय प्रवासाला सुरुवात झाली. आपल्या प्रवासाविषयी नव्या सिंग सांगते, `मी मोठी होती असताना माझी वर्तवणूक मुलीसारखी (Girl in a body of Boy) होती. मी मोठी झाल्यावर अनेक जण माझी चेष्टा करू लागले. गावातल्या व्यक्तींसाठी मी चेष्टेचा विषय ठरले होते. ‘तू मुलगा नाही तर मुलगी आहेस, तुला मुलींसोबतच राहायला पाहिजे,’ असं गावातली मुलं म्हणायची. वयाच्या 12व्या वर्षी मी मुलगी असल्याची जाणीव मला सर्वप्रथम झाली. आई-वडिलांसोबत बाहेर गेले, की माझी अनेक जण चेष्टा करत. या प्रकारामुळे माझ्या वडिलांना अपमानस्पद वाटत असे.` मासिक पाळीदरम्यान Running आरोग्यासाठी चांगलं आहे का? जाणून घ्या फायदे आणि तोटे नव्या सिंगनं सांगितलं, `माझा जन्म पुरुष (Men) म्हणून झाला; पण जसजसा काळ पुढं सरकत गेला, तसतशी मी स्वतःला काहीसं वेगळं फील करू लागले. मी एका छोट्या गावात राहणारी असल्यानं, त्या वेळी अशा गोष्टी स्वीकारणं खूपच अवघड होतं. साधारण 14-15 वर्षांची असताना मी माझ्या आईला काही गोष्टी सांगितल्या. ‘मी माझ्या शरीरावर समाधानी नाही. मला नेहमी मी मुलगी असल्याचं जाणवतं. माझं शरीर आणि आत्मा या गोष्टी विरुद्ध आहेत. मी मुलगी म्हणून आयुष्य जगू इच्छिते,’ असं मी आईला सांगितलं. यावर आईनं मला काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, ‘हे बोलणं खूप सोपं आहे; पण निभावणं खूप अवघड आहे. तुला कोणाचीही साथ मिळणार नाही. तुला संघर्ष करावा लागेल. कदाचित यामुळे तुझ्या जवळच्या व्यक्तीही तुझी साथ सोडतील.’ आईच्या या गोष्टी माझ्या मनाला खोलवर लागल्या.`
शाम्पूमुळे महिलांना येतंय वंध्यत्व; संशोधनात धक्कादायक खुलासानव्या सांगते, `मी पत्रकारितेची (Journalist) पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाशी संबंधित आहे; पण माझं म्हणणं लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे मला समजत नव्हतं. आईनं मला नेहमी सपोर्ट केला. त्या वेळी वडिलांचा मला सपोर्ट नव्हता. वडिलांमुळे मी वयाच्या 18व्या वर्षी मुंबईत आले. मी ‘बीकॉम’ही पूर्ण करू शकले नाही. माझी वर्तणूक मुलींसारखी असल्याची गोष्ट माझ्या वडिलांना अजिबात आवडत नव्हती. ‘तू इथं राहिलास तर अजून बिघडशील, त्यामुळे मुंबईला मावशीकडे निघून जा,’ असं वडिलांनी सांगितलं.`
`वयाच्या 18व्या मी वर्षी मुंबईत आले. तिथून माझा ट्रान्सवुमन म्हणून प्रवास सुरू झाला. माझ्या मनातला 18 वर्षांतला संघर्ष आई-वडिलांना समजला नाही, तो माझ्या मावशीला 18 तासांत समजला. त्यानंतर मावशी मला डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थेत घेऊन गेली. तिथं माझं समुपदेशन (Counseling) झालं. आयुष्य सुलभ व्हावं, यासाठी याला स्त्री म्हणून जगू द्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी हॉर्मोन थेरपी (Hormone therapy) घेणं सुरू केलं. त्यामुळे मी हळूहळू स्त्री होऊ लागले. आता मला स्त्री होऊन दहा ते बारा वर्षं झाली आहेत,` असं नव्या सिंगनं सांगितलं. स्वतःच्या ओळखीसाठी संघर्ष `स्वतःच्या ओळखीसाठी तुम्हाला आयुष्यात संघर्ष करावा लागतो, तेव्हा तो तुमच्यासाठी सर्वांत कठीण काळ असतो. आपण कोण आहोत हे ओळखण्यासाठी करावा लागणारा संघर्ष खूप मोठा असतो. मी घरात सर्वांत मोठी होते. लवकरच मी घरातली कुलदीपक बनेन (तेव्हा मी मुलगा होते) असं माझ्या वडिलांना वाटायचं; पण माझे विचार वेगळे आहेत हे समजात माझ्या वडिलांना जोरदार मानसिक धक्का बसला. त्यामुळे वडिलांसोबत मी मुंबईला आले. वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. आई-वडिलांचं समुपदेशन झालं. त्यानंतर डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर येताच वडिलांच्या डोळ्यांत पश्चातापाचे अश्रू होते. ‘तू मुलगा असो अथवा मुलगी, तू माझं मूल आहेस. आम्ही तुला आमच्या आयुष्यातून दूर करणार नाही,’ असं ते म्हणाले. अशा पद्धतीनं माझ्या वडिलांनी मला स्विकारलं. मला आजही तो प्रसंग आठवला की रडू येतं,` असं नव्या सांगते. पहिली नोकरी मॉडेलिंगची `2016 मध्ये मला भारतातल्या आघाडीच्या मासिकातून मॉडेल म्हणून माझी पहिली नोकरी ऑफर करण्यात आली. त्यानंतर माझा मॉडेल म्हणून प्रवास सुरू झाला. ‘सावधान इंडिया’मध्ये मला मोना ही ट्रान्सवुमनची भूमिका मला मिळाली. 2017 मध्ये मला मिस ट्रान्सक्वीन इंडिया ब्युटी पीजंटविषयी (Miss TransQueen India Beauty Pageant) माहिती मिळाली. मी ऑडिशन दिली. या पीजंटमध्ये सहभागी होऊन मी टॉप-5 स्पर्धकांमध्ये आले. त्यांनी मला मिस ट्रान्सक्वीनची ब्रँड अॅम्बेसिडर बनवलं. मी जेव्हा ट्रान्सजेंडर कम्युनिटीत आले, तेव्हा येथे शिक्षणाची कमतरता असल्याचं मला जाणवलं,` असं नव्या म्हणाली.
फेअरनेस क्रिममध्ये होतोय या घातक घटकाचा अतिवापर; खरेदी करताना तपासा या गोष्टी
`माझं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर मी गावाकडे घरी आले तेव्हा मला पाहण्यासाठी गावतल्या नागरिकांची रीघ लागली. एकेकाळी जे माझी चेष्टा करायचे, माझ्याकडे दुर्लक्ष करायचे, तेच मी मुलगी बनल्यावर मला पाहायला येऊ लागले. यामुळं मला काहीसं विचित्र वाटलं; पण यामुळे मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली,` असं नव्या सिंग सांगते. लग्नाबद्दल काय वाटतं? `सध्या माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. मला करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. माझा जोडीदार हा नक्कीच मला समजून घेणारा असेल. तो समजुतीनं आयुष्य जगू शकणार असेल, तरच मी त्याच्यासोबत लग्न करण्याचा विचार करीन. मी एक बायोपिक (Biopic) फिल्म केली आहे. हा चित्रपट कस्टम ऑफिसर एन्सन थॉमस यांच्या जीवनावर आधारित आहे. रेडलाइट एरियातल्या सेक्स रॅकेटवर हा चित्रपट आधारित आहे. `प्लीज टू प्रोटेक्ट` असं त्याचं नाव असून सुरेश जडे त्याचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात मी आयटम सॉंग करत आहे. चित्रपट आयटम सॉंग करणारी मी पहिली ट्रान्सवुमन आहे,` असंही नव्यानं सांगितलं. `देवानं प्रत्येकाला एक आयुष्य दिलं आहे. कोणालाही जज करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण प्रेमानं राहणं गरजेचं आहे. शेवटी मी त्या सर्व पालकांना सांगू इच्छिते, की ही तुमचीच मुलं आहेत. तुम्हीच त्यांना जन्म दिला आहे. तुम्ही त्यांना सोडून दिलं तर तुम्ही त्यांचे गुन्हेगार आहात. तुम्ही त्यांना जन्माला घातलं आहे. मग मूल आयुष्यात कुठेही जात असेल, तर घराबाहेर न काढता त्याला आधार द्या,` असं नव्या स्पष्ट करते.