JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या अमेरिकन रॅपरनं कपाळावरच जडवला कोट्यवधींचा हिरा, पाहा व्हायरल VIDEO

या अमेरिकन रॅपरनं कपाळावरच जडवला कोट्यवधींचा हिरा, पाहा व्हायरल VIDEO

हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. या रॅपरनं केलेलं काम पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 4 फेब्रुवारी : हौसेला मोल नसतं म्हणतात ते खरंच आहे. अमेरिकेत एका व्यक्तीनं ही म्हण आपल्या एका कृतीतून खरी करून दाखवली आहे. ही व्यक्ती एक प्रसिद्ध रॅपर आहे. रॅपरनं केलेल्या कृतीला कुणी वेडेपणाही म्हणेल. या गोष्टीसाठी पैसे खर्च करणं कुणाला विचित्रही वाटेल. मात्र हौस आणि पैसा एकत्र आला तर काय होऊ शकतं याचं उदाहरण या रॅपरनं घालून दिलं आहे. लील उजी वर्ट या अमेरिकन रॅपरनं (American rapper) आपल्या कपाळावर (forehead) एका हिऱ्याची पियर्सिंग केली आहे. हा हिरा कमालीचा मौल्यवान आहे. या रॅपरच्या कपाळावर चीर पाडत तिथं हा हिरा जडवला गेला आहे. 14 कॅरेटचा हा हिरा (diamond) गुलाबी रंगाचा (pink) आहे. याची किंमत ऐकूनच लोक हैराण होत आहेत. या रॅपरचे कपाळावर हिरा जडवलेले फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर (social media) कमालीचे व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या

लिटल उझीवर्टचं (liluzivert) खरं नाव आहे सीमर बेसिल वुड्स. त्यानं नुकतेच सोशल मीडियावर आपल्या या नव्या अवतारातले फोटो आणि व्हिडिओज टाकले आहेत. यात त्यानं 14 कॅरेटचा मौल्यवान हिरा कपाळावर जडवला आहे. या हिऱ्याची किंमत आहे तब्बल 24 मिलियन डॉलर. याची भारतीय चलनात किंमत होते 174 कोटी 99 लाख 84 हजार रुपये. या सेलिब्रिटीनं इतके रुपये खर्च केले केवळ कपाळावर हिरा बसवायला! हे वाचा - पॉप स्टार रिहाना मुस्लिम आहे का? गुगल ट्रेंड्सनुसार भारतानं केलं सर्वाधिक सर्च या सेलिब्रिटी हिऱ्याच्या Eliot या प्रसिद्ध कंपनीला 2017 पासून यासाठीची किंमत थोडीथोडी करून देत होते. आता हा हिरा त्याच्या ताब्यात आला आहे. लील म्हणतो, की हा हिरा आपल्या माथ्यावर जडवणं हे माझं स्वप्न होतं. Eliot ही कंपनी या रॅपरच्या माथ्यावर हिरा जडवतानाचा व्हिडिओसुद्धा (video) लवकरच लोकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या