JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मुलांसमोर पालकांनी या 6 गोष्टी बोलू नयेत; त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतो चुकीचा परिणाम

मुलांसमोर पालकांनी या 6 गोष्टी बोलू नयेत; त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतो चुकीचा परिणाम

मुलांचे संगोपन करताना पालकांसाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मुलांशी कसे बोलावे. हे अगदी साधे वाटेल, परंतु पालकांचे मुलांशी असलेले वागणे मुलांच्या मानसिकतेवर बराच प्रभाव टाकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : लहान मुलांमधील चांगले किंवा वाईट गुण हा त्यांचा स्वतःचा दोष नसून पालकांकडून त्यांच्यावर होणारी वागणूक हेच यामागचं मोठं कारण म्हणता येईल. पालक या चुका जाणूनबुजून करत नसतील आणि कधी कधी मुलांचे चांगले भविष्य घडवण्यासाठी, ते नकळत अशा काही गोष्टी करायला लागतात किंवा असे वागू लागतात की, त्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर चुकीचा परिणाम होऊ लागतो. Parents.com च्या माहितीनुसार, मुलांचे संगोपन करताना पालकांसाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मुलांशी कसे बोलावे. हे अगदी साधे वाटेल, परंतु पालकांचे मुलांशी असलेले वागणे मुलांच्या मानसिकतेवर बराच प्रभाव टाकते. त्यासाठी मुलांचे चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मुलांसोबत कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या चांगल्या गोष्टींचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होऊ शकतो, याविषयी आज जाणून घेऊया. अशा गोष्टी मुलांसोबत कधीही करू नका - नेहमी स्तुती करणे : संशोधनात असे आढळून आले आहे की, जेव्हा तुम्ही मुलांना ‘गुड बॉय, चांगला मुलगा’ किंवा ‘खूप छान’ असं सारखं म्हणत असता, तेव्हा हळूहळू मुलं फक्त तुमची प्रशंसा मिळवण्यासाठी काम करू लागतात. पण जेव्हा तुम्ही त्याला सांगता की तुम्ही तुमच्या टीमसोबत चांगले काम केले आहे, तेव्हा अशा गोष्टी त्याला चांगले टीमवर्क करण्यास प्रवृत्त करतात. नेहमी मनोबल ढासळू नका: मनोबल ढासळवणाऱ्या गोष्टी सतत बोलत राहिल्याने अधिक सराव करणे किती महत्त्वाचे आहे, असा संदेश मुलाल मिळतो, परंतु त्याचा मुलावर असा परिणाम होतो की, त्याने केलेले कष्ट पुरेसे नव्हते, असे त्याला वाटू लागते. मनोबल न ढासळता तुम्ही त्याला कठोर परिश्रमासाठी प्रेरित केले पाहिजे. आर यू ओके : तुमचे मूल एखाद्या गोष्टीबद्दल नाराज असेल किंवा तुमच्यासमोर रडत असेल, तर त्याला ‘आर यू ओके’ असे म्हणणे त्याला आणखी अस्वस्थ करू शकते. जर तुम्ही त्याला मिठी मारली आणि तुम्हाला त्याचा त्रास समजला आहे असे, त्याला वाटू द्याल तर बरे होईल. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला सांगू शकता की ‘तुला किती त्रास झाला असेल ते मी समजू शकतो’. लवकर कामे आटपा: मुलांनाच फक्त लवकर कामे आटपा असं म्हणंण चुकीचं आहे. उलट त्याऐवजी तुम्ही म्हणू शकता आपण सगळे लवकर काम आटपुया. असे केल्याने त्याला वाटेल की आपण एकसंघ आहात. हे वाचा -  विराट कोहलीसारखं डाएट फॉलो करायचंय? ‘या’ पदार्थांचा करा आहारामध्ये समावेश आम्ही ते खरेदी करू शकत नाही: एखाद्या वस्तूच्या बाबतीत असे म्हटल्याने मुलाला मानसिक आघात होऊ शकतो. त्याऐवजी, जर तुम्ही त्याला सांगितले की आम्ही यासाठी पैसे जमा करू, तर हा त्याच्यासाठी पैशांचे व्यवस्थापन कसे करावे लागते, यासाठीचा धडा असेल. नेहमी सावध राहण्याचा सल्ला देणं : रस्त्याने चालताना तुम्ही तुमच्या मुलाला वारंवार काळजी घे-काळजी घे असे बोलत राहिल्यास या गोष्टी त्याचे लक्ष विचलित करू शकतात. जर तुम्हाला जाणीव असेल किंवा तुम्हाला पुढील प्रसंगाची भीती वाटत असेल तर तुम्ही पुढे जाऊन त्याच्या सोबत त्याचा हात धरून थांबू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या