JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diabetic Diet: साखरेपेक्षाही गोड आहेत हे पदार्थ, डायबिटीजचे रुग्णसुद्धा खाऊ शकतात

Diabetic Diet: साखरेपेक्षाही गोड आहेत हे पदार्थ, डायबिटीजचे रुग्णसुद्धा खाऊ शकतात

मधुमेही रुग्ण पर्यायी स्वीटनर्स वापरतात जे बाजारात टॅब्लेटच्या स्वरूपात उपलब्ध असतात, परंतु ते देखील जास्त वापरण्याची शिफारस केली जात नाही. त्याऐवजी 4 हेल्दी गोड पदार्थ वापरता येतात आणि ते टेस्टमध्ये साखरेपेक्षा जास्त गोड असतात.

जाहिरात

मधुमेही रुग्णांनी बटाट्याचे जास्त सेवन केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. म्हणजेच ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी बटाट्यापासून दूर राहिल्यास बरे होऊ शकते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून : मधुमेही रुग्णांसाठी साखर ही एखाद्या विषापेक्षा कमी नाही कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढते. शुगर पातळी नियंत्रित केली गेली नाही तर ती इतर अनेक आजारांना जन्म देते आणि शेवटी घातक ठरते. डायबिटीज असेल तर गोड पदार्थांपासून जितके जास्त अंतर ठेवले जाईल तितके चांगले. पण, चवीला गोड पदार्थ खाल्ल्याने प्रत्येक वेळी नुकसान होतेच (Artificial Sweetener For Type 2 Diabetes) असे नाही. साखरेपेक्षा गोड पण आरोग्यदायी गोष्टी - झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, मधुमेही रुग्ण पर्यायी स्वीटनर्स वापरतात जे बाजारात टॅब्लेटच्या स्वरूपात उपलब्ध असतात, परंतु ते देखील जास्त वापरण्याची शिफारस केली जात नाही. परंतु, त्याऐवजी 4 हेल्दी गोड पदार्थ वापरता येतात आणि ते टेस्टमध्ये साखरेपेक्षा जास्त गोड असतात. मधुमेहाचे रुग्ण हे सकस गोड पदार्थ खावू शकतात - 1. एस्पार्तामे (Aspartame) aspartame ला NutraSweet म्हणून देखील ओळखले जाते. ते एक नॉन न्यूट्रिटिव आर्टिफिशियल स्वीटनर असून साखरेपेक्षा खूप गोड आहे, त्यात कॅलरीज जवळपास नाहीच. मात्र, थोडे कार्बोहायड्रेट आहेत. 2. याकोन सिरप (Yacon Syrup) याकॉन सिरप हे याकॉन वनस्पतीपासून तयार केलेले एक अद्वितीय कृत्रिम स्वीटनर आहे. हे दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत रांगेत (Andes Mountain Range) उगवले जाते, ते विरघळणारे फायबर म्हणून काम करते आणि लठ्ठ लोकांमध्ये चरबी कमी करण्यास देखील मदत फायदेशीर आहे. हे वाचा -  पुरुषांनी नक्की घ्यायला हव्यात या लसी; गंभीर आजारांचा राहत नाही धोका 3. जाइलिटोल (Xylitol) Xylitol हा एक विशेष प्रकारचा पदार्थ आहे ज्याचा गोडवा साखरेसारखा आहे आणि त्याच्या एका ग्रॅममध्ये 2.4 कॅलरीज असतात. हे केवळ मधुमेहासाठीच नाही तर दातांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. यामुळे पोकळी आणि हिरड्यांना आलेली सूज बरी होऊ शकते. xylitol खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही आणि त्याच बरोबर पचनक्रियाही चांगली राहते. हे वाचा -  Diabetes असेल तर या भाज्या चुकून पण खायच्या नसतात; कंट्रोलमध्ये नाही राहणार शुगर 4. स्प्लेंडा स्प्लेंडा किंवा सुक्रॅलोज हे नॉन न्यूट्रिटिव नसलेले कृत्रिम स्वीटनर आहे. जे टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. स्प्लेंडा सामान्य साखरेपेक्षा कितीतरी पटीने जास्त गोड असतो, पण ते खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर फारसा परिणाम होत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या