JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ...तर घटस्फोट हाच योग्य पर्याय! जोडीदाराच्या या चुकांकडे दुर्लक्ष करून नाही चालत

...तर घटस्फोट हाच योग्य पर्याय! जोडीदाराच्या या चुकांकडे दुर्लक्ष करून नाही चालत

बहुतांश परिस्थितीत नातेसंबंध वाचवण्यासाठी अनेकदा लोक जोडीदाराची चूक माफ करून पुढे जातात. अर्थात नातं अधिक मजबूत होण्यासाठी तुमचं हे वागणं महत्त्वाची भूमिका बजावतं, पण जर…

जाहिरात

घटस्फोट कधी घ्यावा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 नोव्हेंबर : नवरा-बायकोचं नातं म्हटलं की वाद-विवाद, भांडण होणारच. दोघांचे विचार एकत्र करून चालताना थोडे रुसवे-फुगवे होणार यात शंका नाही. एकमेकांकडून चुका होणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. बहुतांश परिस्थितीत नातेसंबंध वाचवण्यासाठी अनेकदा लोक जोडीदाराची चूक माफ करून पुढे जातात. अर्थात नातं अधिक मजबूत होण्यासाठी तुमचं हे वागणं महत्त्वाची भूमिका बजावतं, पण जर तुमचा जोडीदार काही चुका पुन्हा पुन्हा करत असेल, तर त्याच्यासोबत ब्रेकअप/घटस्फोट करणं तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. खरं तर, नात्यात प्रत्येकाकडून छोट्या-छोट्या चुका होतात, पण काही चुका तुमच्या नात्यातील कटुता वाढवण्याचे काम करतात. त्याच चुका पुन्हा पुन्हा होत राहिल्यास तुमचे आनंदी नाते तणावपूर्ण बनते. जोडीदाराच्या अशा चुकांबद्दल जाणून घेऊया, ज्या वारंवार होत असतील तर ब्रेकअप/ घटस्फोट घेणेच उत्तम ठरते. खोटं बोलणं - सामान्यतः विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. अशा परिस्थितीत जर तुमचा पार्टनर तुमच्याशी वारंवार खोटं बोलत असेल तर हे नातं वाचवणं तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला सत्य सांगण्याचा सल्ला देऊ शकता. पण, कित्येक वेळा सांगूनही पुन्हा-पुन्हा खोटं बोलणं सुरूच असेल तर त्या जोडीदारापासून वेगळे होणे चांगले. कॉल- मेसेज टाळणे - जर तुमचा पार्टनर तुमच्या फोन कॉल्स आणि मेसेजकडे सतत दुर्लक्ष करत असेल, टाळत असेल तर तुम्हाला तुमच्या नात्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कॉल आणि मेसेज टाळणे म्हणजे तुमच्या जोडीदाराला तुमच्याशी बोलण्यात फारसा रस नाही. अशा परिस्थितीत, आपण एकटे हे नाते जास्त काळ ओढत नेऊ शकत नाही. भांडण- मारामारी - नात्यात अनेकदा भांडणे होत राहतात. पण जर जोडीदारासोबत प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडण होत असेल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. वास्तविक, सामान्य जोडपं आपसी चर्चा करून छोटे-छोटे भांडण सोडवतात. पण काही प्रकरणांमध्ये छोट्या भांडणांचेही मोठ्या मारामारीत रूपांतर होते. अशा परिस्थितीत मात्र जोडीदाराशी ब्रेकअप करणे चांगले.

फसवणूक/अफेअर - आजच्या आधुनिक जीवनशैलीत एकापेक्षा जास्त रिलेशनमध्ये अडकणे हा चुकीचा ट्रेंड झाला आहे. अशा गंभीर बाबतीत तुमची फसवणूक होत असल्यास तुमच्या जोडीदारासोबत राहण्यात अर्थ नाही. तुमच्या जोडीदाराला याबाबतील समज देऊनही तो बदलत नसल्यास तुम्ही ब्रेकअपबद्दल विचार करणंच योग्य ठरेल. हे वाचा -  Chanakya Niti : बायकोनं नवऱ्यासाठी नेहमी कराव्यात ‘या’ गोष्टी एक्सशी संबंध - अनेक वेळा विवाह बंधनात अडकल्यानंतरही लोक आपल्या एक्सला (गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड) विसरू शकत नाहीत. बहुतेक लोक त्यांच्या जोडीदाराची X शी तुलना करू लागतात आणि जोडीदाराशी X बद्दल सतत बोलत राहतात. अशा परिस्थितीत जोडीदाराच्या या सवयीवर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि जर तो सहमत नसेल तर ब्रेकअप तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या