JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वडिलांशी बोलताना या गोष्टींचे नेहमी भान ठेवा, तुमचे हे शब्द त्यांचे मन खूप दुखावतात

वडिलांशी बोलताना या गोष्टींचे नेहमी भान ठेवा, तुमचे हे शब्द त्यांचे मन खूप दुखावतात

Relationship with Father: बोलताना मुलांच्या काही गोष्टी वडिलांनाही दुःखी करू शकतात. विनोद मस्करी ठीक आहे पण काही गोष्टी वडिलांशी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्याविषयी सविस्तर पाहुया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 नोव्हेंबर : साधारणपणे सर्व मुले त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ असतात. बहुतांश मुलं प्रत्येक गोष्ट पालकांसोबत शेअर करतात. त्यामुळे सोबतच मुलं पालकांसोबत मजा-मस्करी करायलाही मागेपुढे पाहत नाहीत तसेच काही त्यांची खूप चेष्टाही करतात. अर्थात सर्वच पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. पण मुलं अनेकदा गमतीने किंवा नकळत काही गोष्टी वडिलांना बोलतात, ज्यामुळे वडील आतून खूप दुखावले जाऊ शकतात. वास्तविक मुलांचे आणि वडिलांचे नाते खूप खास असते. काही वेळा मुलांना वडिलांच्या टोमणे आणि रागाची भीती वाटते. वडील मनमिळाऊ असतील तर मुलं मोकळेपणाने हसतात आणि त्यांच्याशी विनोद-गप्पा करतात. मात्र, विनोद करताना असो किंवा बोलताना मुलांच्या काही गोष्टी वडिलांनाही दुःखी करू शकतात. विनोद मस्करी ठीक आहे पण काही गोष्टी वडिलांशी बोलताना काळजी घ्यायला हवी. तुमचा काळ गेला आता - अनेक वेळा मुलं वडिलांना बोलताना सहज सांगतात की, बाबा आता तुमचा जमाना गेला. कदाचित असं बोलून त्यांना वडिलांना नाराज करायचे नसते. परंतु हे मुलाचे बोल वडिलांना खूप त्रास देऊ शकते. त्यामुळे वडिलांना गंमतीतही असं म्हणणं टाळावं. तुमचं आता वय झालंय - वृद्धापकाळात, पालकांना अनेकदा शारीरिक आणि मानसिक अडचणी सुरू होतात. अशा स्थितीत मुलं अनेकदा वडिलांना विसरभोळे किंवा बुद्धी काम करत नाही किंवा हाडे कमकुवत झाल्याबद्दल सांगत राहतात. ज्यामुळे तुमचे वडील या गोष्टी ऐकून दुःखी होऊ शकतात. त्यामुळे वडिलांना पुन्हा पुन्हा तुम्ही म्हातारे झाला आहात, वय झालं आहे असं म्हणण्याऐवजी नवीन गोष्टी करून पाहण्यास प्रोत्साहित करा.

वडिलांना दोष देणं - अनेक वेळा मुलं त्यांच्या आयुष्यातील चुकांसाठी पालकांना दोष देतात. तसं पाहिलं तर, पालक हे आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवतात. पण जेव्हा आयुष्यात यश मिळत नाही तेव्हा मुलं वडिलांना विचारतात की, तुम्ही माझ्यासाठी काय केले? तेव्हा वडिलांच्या मनाला फार भावनिक दुखापत होते. सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष करणे - अनेक वेळा मुलं वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात आणि वाद घालू लागतात की पप्पा तुमचा जमाना गेला आहे. तुम्हाला आमचा काळ कळणार नाही. तुमचा युक्तिवाद पूर्णपणे निराधार आहे, असे म्हणतात. पण, वय कितीही असो वडिलधाऱ्यांचा अनुभव जीवनात योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतो. त्यामुळे वडिलांच्या सल्ल्याचा विचार करावा, त्यांना काही बोलूच न देणं, अपमान करणं योग्य नाही. हे वाचा -  हिवाळ्यात जास्त आळस का येतो? थंडीतही अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी करा हे उपाय वडिलांनी केलेल्या कष्टाला मान द्या - सहसा आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर वृद्धापकाळात व्यक्ती सर्व कामातून निवृत्ती घेते. अशा वेळी मुलं अनेकदा वडिलांना सांगतात की बाबा, तुम्हाला काय काम आहे, फक्त जेवून झोपत असता. त्यामुळे तुमचे असे शब्द तुमच्या वडिलांच्या विश्रांतीच्या काळात चिंतेचे कारण बनू शकतात. त्यामुळे तुमच्या वडिलांच्या संघर्षाचा आदर करायला शिका आणि त्यांना अशा गोष्टी अजिबात बोलू नका. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहिती संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या