JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / एकदम नॉर्मल वाटणाऱ्या या सवयी किडनी खराब करू शकतात; या चुका अनेकांकडून होतात

एकदम नॉर्मल वाटणाऱ्या या सवयी किडनी खराब करू शकतात; या चुका अनेकांकडून होतात

किडनी फेल्युअरचा उपचार खूप खर्चिक असतो आणि त्यामुळे जीव जाण्याचाही धोका असतो. म्हणूनच आपण अशा चुका करू नयेत ज्याचा वाईट परिणाम किडनीवर (Kidney health) होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 मार्च : किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. किडनीच्या कार्य प्रणालीमध्ये काही गडबड झाल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. किडनी फेल्युअरचा उपचार खूप खर्चिक असतो आणि त्यामुळे जीव जाण्याचाही धोका असतो. म्हणूनच आपण अशा चुका करू नयेत ज्याचा वाईट परिणाम किडनीवर (Kidney health) होईल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते. अनेकांना याविषयी माहीत असूनही त्याकडं लक्ष दिलं जात नाही. आज आपण अशाच काही चुकांविषयी जाणून घेऊया, ज्या आपण नकळत करत राहतो, ज्यामुळे भविष्यात आपली किडनी खराब (Kidneys can be damaged) होऊ शकते. जास्त वेळ एका जागी बसणं हिंदुस्थान टाईम्स ने दिलेल्या बातमीनुसार, ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे, पण जास्त वेळ बसून राहिल्यानं आपल्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. बसून राहिल्याचा किडनी खराब होण्याशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप संशोधकांना कळू शकलेलं नाही. पण ही बाब समोर आली असेल, तर काळजी घ्यायला हवी. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं गरजेचं आहे. हे आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. वेदनाशामक औषधं खाणं तुम्ही याआधी अनेकांच्या तोंडून हे ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की, वेदनाशामक औषधांचा मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो. वारंवार वेदनाशामक औषध किंवा इतर काही घरगुती उपाय करणं टाळायला हवं. याचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो. हे वाचा -  त्वचा आणि केसांसाठी आंब्याच्या पानांचा असा होतो उपयोग, ही पद्धत जाणून घ्या कमी पाणी पिणं मूत्रपिंड आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. जरी तुम्हाला किडनीची समस्या नसेल तरी दररोज दीड ते दोन लिटर पाणी नक्कीच प्या. असं केल्यानं आपल्याला मुतखड्याचा त्राससुद्धा कधी होणार नाही. हे वाचा -  Depression:डिप्रेशन येणं आहे खूप घातक; वेळीच ओळखा त्याचे प्रकार आणि विविध लक्षणं जास्त मीठ खाणे जेवणाच्या ताटात अनेकांना मीठ वाढून घ्यायची सवय असते. जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे आपल्या किडनीला जास्त काम करावे लागते. असे वारंवार होत राहिल्या किडनी खराब होण्याची शक्यता असते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या