JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Foods for blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवतात या 5 गोष्टी; आहारात घ्यायला विसरू नका

Foods for blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवतात या 5 गोष्टी; आहारात घ्यायला विसरू नका

नसांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यांच्यामध्ये घाण साचू शकते, ज्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये गडबड होण्याचा धोका वाढतो. काहीवेळा शिरा घट्ट किंवा कडक झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 मार्च : आपले शरीर अनेक प्रकारच्या धमन्या आणि रक्तवाहिन्यांनी बनलेले (blood vessels) आहे. शरीरात असलेल्या या धमन्या आणि रक्तवाहिन्या हृदयापासून शरीराच्या ऊतींमध्ये रक्त पुढे-पुढे नेण्याचे काम करतात. निरोगी आरोग्यासाठी रक्तवाहिन्यांची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, निरोगी रक्तवाहिन्या या मऊ आणि लवचिक असतात, ज्यामुळे रक्त सहज वाहू शकतं. आपण नसांची काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल (Foods for blood vessels) जाणून घेऊया. झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, जर नसांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यांच्यामध्ये घाण साचू शकते, ज्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये गडबड होण्याचा धोका वाढतो. काहीवेळा शिरा घट्ट किंवा कडक झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञ म्हणतात की नसा आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असले पाहिजे. तसेच सकस आहाराचे पालन केले पाहिजे. नसा निरोगी राहण्यासाठी उपाय 1. फायबर समृध्द अन्न फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल सुधारण्यास मदत होते, रक्तवाहिन्या बंद होण्याचे सर्वात मोठे कारण हे असते. रिफाइंड धान्यांऐवजी संपूर्ण धान्य आहारात घ्या आणि खारट चिप्स किंवा गोड कँडीजऐवजी स्नॅक्स म्हणून फळे आणि भाज्या खा. 2. हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या रक्तवाहिन्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुमच्या आहारात विविध रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करून तुम्ही मज्जातंतूंचे आरोग्य सुधारू शकता. बायोफ्लाव्होनॉइड हे फायटोन्यूट्रिएंट्स आहेत जे हिरव्या भाज्यांमध्ये आढळतात, ज्यामुळे रक्त परिसंचरण सुधारतात. यासोबतच त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आढळतात, ज्यामुळे नसा मजबूत होतात. हे वाचा -  स्ट्रेस घालवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे; संशोधनातूनही आता झालं स्पष्ट 3. लाल मिरची आणि हळद काही मसालेही नसा निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतात. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होण्यापासून बचाव होतो. दुसरीकडे, लाल मिरची रक्ताभिसरण उत्तेजित करते आणि रक्त प्रवाह राखण्यास आणि निरोगी अभिसरणास मदत होते. 4. मीठ कमी खा जर तुम्हाला नसा निरोगी ठेवायच्या असतील तर सोडियमचे प्रमाण कमी करा. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, मज्जातंतूंचे आरोग्य राखण्यासाठी अन्नातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही प्रक्रिया केलेले किंवा प्री-पॅक केलेले अन्न टाळावे, कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. विशेष काळजी घ्या की प्रक्रिया केलेलं किंवा पॅकबंद अन्न खरेदी करण्यापूर्वी त्यात सोडियमचे प्रमाण तपासा. हे वाचा -  घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही या गोष्टी ठेवू नका; सगळ्या कामांची होते वाताहात 5. पुरेसं पाणी निरोगी राहण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. शरीरात सुमारे 93 टक्के पाणी असते. नसा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावं. यामुळे तुमच्या शरीराच्या कार्यावर जास्त प्रेशर येणार नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या