मुंबई 13 डिसेंबर : आपण कसे चालतो, बोलतो आणि बसतो यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. त्याचप्रमाणे खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीच्या बसण्याच्या शैलीवरून त्याच्या स्वभावाबाबतचे अनेक पैलू उघड होऊ शकतात. खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसणे कधीकधी तुमच्यासाठी नुकसानीचे देखील ठरू शकते. कारण चुकीच्या बद्धतीत बसल्यामुळे समोरच्या व्यक्तिवर तुमच्या चुकिचा प्रभाव पडू शकतो. आज आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. सरळ गुडघे ठेऊन बसणे (Knees Straight) खुर्चीवर गुडघे सरळ ठेवून बसणारे लोक बुद्धिमान, तर्कशुद्ध विचार करणारे, वक्तशीर मानले जातात. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार असे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात. त्यांच्यात खूप आत्मविश्वास असतो. अशा लोकांना नोकरीच्या मुलाखतींमध्ये प्राधान्य दिले जाते. बसण्याच्या या स्थितीमुळे आत्मविश्वासही वाढतो.
सर्व आकड्यांचा खेळ! रोजच्या वापरातील अंकांचा तुमच्या आयुष्यावरही होतोय थेट परिणामगुडघ्यांमध्ये अंतर ठेऊन बसणे (Knees Apart) या स्थितीत बसलेले लोक गर्विष्ठ, स्वार्थी, जजमेंटल आणि खूप लवकर कंटाळणारे असतात. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जे लोक दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवून बसतात त्यांचे मन आणि दिनचर्या खूप गोंधळलेली असते. असे लोक कोणत्याही गोष्टीवर दिर्घकाळ लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. हे लोक नेहमी नवीन गोष्टींकडे आकर्षित होत असतात, त्यामुळे त्यांना कोणतेही काम व्यवस्थित करता येत नाही. या स्थितीत बसणाऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपली विचारसरणी कोणावर तरी लादण्याचा प्रयत्न करतात.
पायावर पाय ठेवून बसणे (Crossed Legs) क्रॉस लेक किंवा पायावर पाय ठेवून बसणारे लोक ते सर्जनशील, सभ्य आणि लाजाळू असतात. हे लोक मुक्तपणे जीवनाचा आनंद घेतात. हे लोक त्यांना जे काम योग्य वाटत नाही ते कधीही करत नाहीत. क्रॉस लेग पोझिशनमध्ये बसलेले लोक खुले आणि निश्चिंत असतात तसेच ते विचारांनी नेहमी सकारात्मक असतात. या लोकांना निश्चिंतपणे जीवनाचा आनंद लुटण्साठी प्रवास करणे आवडते.
पाय खालील बाजूस क्रॉस करून बसणे (Ankle Crossed) पाय खालील बाजूस क्रॉस करून बसणे ही ब्रिटिश राजघराण्याची बसण्याची स्थिती आहे. जे लोक पाय क्रॉस करून बसतात त्यांची वृत्ती राजेशाही असते. असे लोक आत्मविश्वासू, शाही आणि डाउन टू अर्थ असतात. हे लोक जीवनातील प्रत्येक आव्हानांना सामर्थ्याने सामोरे जाऊ शकतात.
Baby Tooth Coming Out : तुम्हाला माहितीये? या महिन्यात बाळाचे दात आल्यास ते मानले जातात शुभएका पाय दुसऱ्या पायावर ठेवून बसणे (Figure Four leg lock) झी न्यूज हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, एका पायाचे मनगट दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवून बसणारे लोक (Figure Four leg lock) आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि नेतृत्व करणारे मानले जातात. हे लोक नेहमीच खूप सक्रिय आणि उत्साही असतात. इतरांवर राज्य करणारे लोकही या स्थितीत बसतात.