मुंबई, 01 ऑगस्ट : सामान्यतः लोक चांगल्या शरीरासाठी आणि फिटनेससाठी प्रोटीनयुक्त अन्न आणि सॅलडचा आहारात समावेश करणे योग्य मानतात. मात्र अभिनेत्री तापसी पन्नूचे मत जरा वेगळे आहे. ती म्हणते हे केवळ एक मिथक आहे की, जेवढ्या कमी कार्बोहायड्रेटयुक्त गोष्टी आहारात असतील तितके अधिक परिपूर्ण शरीर तुम्हाला मिळेल. तापसी म्हणते, ती प्रत्येक आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करते आणि हीच तिची सर्वात मोठी फिटनेस टीप असू शकते. ही सर्व माहिती तापसीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. तापसीने सिलॅब न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल यांच्या मदतीने तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनशी संबंधित माहिती शेअर केली. काही दिवसांपूर्वी ‘शाबाश मिठू’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ती माजी कर्णधार मिताली राजची भूमिका साकारताना दिसत आहे. दिवसाची सुरुवात कार्बयुक्त नाश्त्याने करते तापसी तापसी पन्नू अॅथलेटिक फिगरसाठी कार्बोहायड्रेट युक्त नाश्त्याने दिवसाची सुरुवात करते. तिने सांगितले की, उत्तम शरीरासाठी केवळ प्रोटीनचे सेवन महत्त्वाचे नाही, तर तुम्ही किती संतुलित आहार घेता हेदेखील महत्त्वाचे आहे.
ह्या 6 कारणांसाठी नियमित पोहायला हवं! शेवटचं कारण सर्वात महत्त्वाचं फायबरयुक्त अन्न देखील महत्वाचे आहे तिने सांगितले की ती तिच्या आहारात फायबरदेखील मोठ्या प्रमाणात घेते. यासाठी ती आहारतज्ज्ञाच्या सांगण्यावरून रताळ्याची टिक्की खाते अन ही तिला खूप आवडते. प्रोटीनसाठी देसी लाडू तापसी म्हणते की तिला प्रोटीन बार किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स घेणे आवडत नाही. त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तिने आहारात बेसन, खोबरे, मेवा, डिंक आणि तुपापासून तयार केलेले लाडू समाविष्ट केले आहेत. त्याला प्रोटीन एनर्जी बॉल म्हणता येईल.
तापसीनुसार असा असावा संपूर्ण दिवसाचा आहार ती तिच्या दिवसाची सुरुवात अंडी, रताळे, ज्वारीच्या रोटीने करते. तापसीला दुपारी शाकाहारी पदार्थ खायला आवडतात. यासाठी ती नियमितपणे भात, डाळी आणि दही घेते. तिचे प्रत्येक जेवण घरगुती असते आणि ती तिच्या आहारात कमीत कमी तेलकट पदार्थांचा समावेश करते. याशिवाय कधी-कधी ती आपल्या आहारात तुपाचा समावेशदेखील करते. पचनक्रिया चांगली करण्यासाठी, भरपूर पाणी प्या आणि फळे खा. तापसीला दिवसातून दोन कप ग्रीन कॉफी प्यायला आवडते.