पंखा, एसी बंद असताना किंवा उन्हाळ्यात घाम (sweating) येणं सामान्य आहे. मात्र पंखा, एसी सुरू असताना, थंडीतही आणि विशेषतः रात्री झोपण्याच्या वेळेसच घाम घेत असेल तर हे चिंतेचं कारण आहे. फक्त रात्री झोपताना घाम येणं हे सामान्य नाही तर एका गंभीर आजाराचं लक्षण आहे. आणि हा आजार म्हणजे टीबी (TB). क्षयरोग (tuberculosi) म्हणजे टीबी (TB) हा एक संसर्गजन्य आजार मायकोबॅक्टीरियम ट्युबरकुलोसिस (एमटीबी) जीवाणूमुळे होतो. हा रोग सामान्यत: फुफ्फुसांमध्ये होतो परंतु शरीराच्या इतर भागावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अजय मोहन यांनी सांगितलं आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हवेद्वारे पसरतो. लेटेन्ट आणि अॅक्टिव्ह असे दोन प्रकारचे क्षयरोग असतात. सुप्त क्षयरोग म्हणजे जीवाणू शरीरात असतात मात्र शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्यांना अॅक्टिव्ह होऊ देत नाही. म्हणून टीबीच्या लक्षणांचा अनुभव होत नाही. मात्र सुप्त क्षयरोग असल्यास तो सक्रिय क्षयरोगात रूपांतरित होऊ शकतो. ज्यामध्ये जीवाणू शरीरात अॅक्टिव्ह होतात आणि त्याची लक्षणं जाणवतात आणि हा आजार इतरांमध्ये पसरू शकतो. हे वाचा - फक्त सांधेदुखीच नाही तर ही 5 लक्षणं सांगतात तुम्हाला संधिवात झालाय क्षयरोगात शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो त्या आधारावर लक्षणं विकसित होतात. सक्रिय क्षयरोग असलेल्या रुग्णांना श्वसन प्रणालीशी संबंधित लक्षणांचा अनुभव येतो. जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल आणि त्याच्याबरोबर श्लेष्मा आणि रक्त येत असेल तर डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इतर लक्षणांमध्ये ताप, थकवा, छातीत दुखणे, धाप लागणं, वजन कमी होणं, स्नायू नष्ट होणं या गोष्टींचा समावेश आहे. आणखी एक लक्षण खूप महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे क्षयरोग ग्रस्त व्यक्तीस रात्री घाम फुटतो. काही प्रकरणांमध्ये हाडं आणि सांधे, पाचक प्रणाली, मूत्राशय, पुनरुत्पादक प्रणाली, मेंदू आणि नसा इत्यादी फुफ्फुसांऐवजी इतरत्र क्षयरोग पसरू शकते. पोटदुखी, अतिसार, ग्रंथींना सूज येणं, पाठ आखडणं, फिट येणं, प्रभावित हाडात वेदना आणि काम करण्याची क्षमता कमी होणं इत्यादी लक्षणांचा समावेश आहे. हे वाचा - घशाच्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष; बळावू शकतो गंभीर हृदयरोग क्षयरोगाच्या निदानासाठी छातीचा एक्स-रे आणि क्षयरोगाची तपासणी केली जाते. त्यानंतर कफची तपासणी केली जाते. रक्ताच्या तपासणीद्वारे एखाद्या व्यक्तीला सुप्त क्षयरोग आहे की सक्रिय क्षयरोग याची पुष्टी होते. डॉक्टर प्रतिजैविकांचा वापर करून जीवाणू नष्ट करून क्षयरोगाचा उपचार करतात. myupchar.com च्या डॉ. मेधवी अग्रवाल म्हणतात की, तुम्हाला सक्रीय क्षयरोग असल्यास विशेष काळजी घ्यावी लागेल. जोपर्यंत आपल्याला क्षयरोग आहे तोपर्यंत एकटं राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून या रोगाची लागण इतर कोणालाही होऊ नये. खोकताना आणि शिंकतानाआपले तोंड झाकून घ्या. आहारात जीवनसत्त्वे, खनिजं आणि इतर पोषक घटकांचा समावेश करा. घराची आणि आपल्या स्वच्छतेची काळजी घ्या. डॉक्टरांच्या सूचनेनुसारच औषधं घ्यावीत आणि त्यांनी थांबवायला सांगेपर्यंत योग्यरित्या घेत राहावी. सक्रिय क्षयरोग टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. क्षयरोग असलेल्या व्यक्तीबरोबर बंद खोलीत जास्त वेळ घालवू नका. तोंड झाकून घेणं आणि खोलीत वायुवीजन वापरणं यामुळेही जीवाणूंचा प्रसार रोखू शकतो. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – क्षय रोग न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._