जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घशाच्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष; बळावू शकतो गंभीर हृदयरोग

घशाच्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष; बळावू शकतो गंभीर हृदयरोग

घशाच्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष; बळावू शकतो गंभीर हृदयरोग

बरीच वर्षे या हृदयरोगाची (heart disease) लक्षणं दिसत नाहीत.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    रुमॅटिक हृदयरोग (rheumatic heart disease) ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुमॅटिक ताप हृदय आणि हृदयाच्या झडपेस हानी पोहोचवतो. रुमॅटिक ताप हा एक सूज वर्धक आजार आहे जो स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियासह घश्याच्या संसर्गामुळे होतो. ही सूज हृदयावर परिणाम करू शकते. ज्यामुळे छातीत दुखणं, धाप लागणं आणि थकवा यासारखी लक्षणं उद्भवू शकतात. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. नबी वली यांनी सांगितलं की, बरीच वर्षे रुमॅटिक हृदयरोगामध्ये कोणतीही लक्षणं किंवा चिन्हं दिसत नाहीत. काही सौम्य लक्षणं दिसू शकतात, ज्यात बिछान्यावर आडवे पडल्यावर किंवा व्यायाम करताना छातीत दुखणं, ताप, थकवा, अशक्तपणा जाणवणं, झोपेतून उठणं आणि बसणं किंवा उभे राहावं वाटणं, सांधेदुखी, सूज, त्वचेला गाठ किंवा हृदयात सूज येणं आणि वेदना जाणवणं, हृदयाचा ठोके वेगवान किंवा अनियमित होणं या लक्षणांचा समावेश आहे. गंभीर स्थितीत हृदयाची गती थांबणं, ह्रदयाच्या खराब झालेल्या झडपाचे संसर्ग, हृदयात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यामुळे स्ट्रोक किंवा खराब झालेल्या झडपा फुटल्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अडथळा उद्भवू शकतो. ही आहेत कारणे घशाच्या संसर्गाच्या काही आठवड्यांत रुमॅटिक ताप वाढतो. या संसर्गाच्या दरम्यान घशाच्या आतील भागात सूज किंवा जळजळ होण्याची स्थिती दिसू लागते. कारण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या संसर्गावर प्रतिक्रिया देते. स्ट्रेप्टोकोकल जीवाणूची रचना शरीराच्या काही ऊतींसारखी असते. या कारणास्तव रोगप्रतिकारक शक्ती केवळ जीवाणूंना निशाण्यावर ठेवत नाही तर जीवाणू रचना असलेल्या उतींवर देखील हल्ला करते. असे होईल निदान स्ट्रेप्टोकोकस तपासण्यासाठी रक्त चाचणी किंवा घशातील पेशींचं कल्चर चाचण्या इत्यादी केल्या जातात. यात इकोकार्डिओग्राम चाचणी, इलेक्ट्रोकार्डिओग्राम चाचणी, छातीचा एक्स-रे आणि हृदयाचा एमआरआय केला जातो. जाणून घ्या उपचार समस्या किती वाढली यावर उपचार अवलंबून असतात. इतकंच नाही तर रुग्णाचं वय, त्याची पूर्वीची वैद्यकीय स्थिती, कोणत्याही विशिष्ट औषधाला किंवा थेरेपीसाठीची रुग्णाची सहनशीलतादेखील पाहिली जाते. myupchar चे डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं की, प्रतिजैविक औषधं ही रूमॅटिक तापापासून बचाव करण्याचा उत्तम उपचार आहेत. या औषधांचा स्ट्रेप्टोकोकसमध्ये उपचार म्हणून आणि घशात रूमॅटिक तापाचा संसर्ग टाळण्यासाठी केला जाऊ शकतो. सूज कमी करण्यासाठी किंवा स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी किंवा हृदयाच्या झडपा सुरळीत करण्याकरिता देखील रक्त पातळ करण्याची औषधं दिली जाऊ शकतात. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय हा हृदयाच्या झडपांना झालेल्या हानीवर अवलंबून असतो. जर झडप खूप खराब झाली असेल तर त्या दुरुस्त करण्यासाठी किंवा पुनर्स्थित करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. जर झडप अधिक संकुचित झाले असतील तर फुगवण्याच्या कॅथेटरद्वारे उपचार केले जाऊ शकतात. रुमॅटिक हृदयरोगापासून स्वतःचा बचाव करणं चांगलं ठरेल, ज्यासाठी हृदयाची नियमित तपासणी केली पाहिजे. दात स्वच्छ आणि निरोगी ठेवले पाहिजेत कारण जेव्हा तोंडातून जीवाणू रक्तात जातात तेव्हा हृदयाच्या आतील भागात सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - रुमेटॉइड हृदय रोग : लक्षणे, कारणे… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात