नवी दिल्ली, 30 मे : हृदय धडधडत राहील तोपर्यंत आपण जगाल. हृदयाची कोणतीही समस्या आपलं आयुष्य कमी करू शकते. हल्ली हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची समस्या कमी वयातच लोकांमध्ये वाढत आहे. हृदय शरीराला रक्तासोबत ऑक्सिजनचा पुरवठा करतं. अनेक वेळा खराब जीवनशैली, अनियमित खाणं, जास्त तेलकट-मसालेदार पदार्थांचं सेवन, व्यायाम न करणं, दिवसभर बसून राहणं, शारीरिक हालचाली कमी असणं किंवा नसणं, लठ्ठपणा, अति धूम्रपान, मद्यपान, तणाव, चिंता या कारणांमुळं हृदयाचे विकार होण्याचा (Cardiovascular Diseases) धोका वाढतो. या आजारांपासून हृदयाला वाचवा - हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा ट्रिपल वेसल डिसीज यांसारख्या गंभीर आजारांचा धोका व्हायला नको, असे वाटत असेल, तर आजपासूनच हृदयाची काळजी घेणे सुरू करा. त्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका टाळण्याचे उपाय - तुमचे वजन नियमितपणे तपासत राहा आणि ते विनाकारण वाढू देऊ नका. जे लोक लठ्ठ आहेत त्यांनी नियमित व्यायाम करायलाच हवा. रोजच्या आहारात जास्तीत जास्त सकस पदार्थ खा. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मिठाचे सेवन कमी करा. जास्त कॉफी प्यायल्याने रक्तदाब वाढतो, जो हृदयासाठी चांगला नाही. मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यांनी खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधं घेऊ नका. चालताना किंवा धावताना हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. तेलकट पदार्थांपासून शक्यतो दूर राहा. हा आहार घ्या - कोणालाही हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आहारात बदल करा. यासाठी ओमेगा-3, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि मिनरल्सने युक्त पदार्थ खा. विशेषत: जेवणात रसाळ फळे, सुका मेवा खा. जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहा. शारीरिक अॅक्टिविटी आवश्यक - हृदय निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहारासोबत शारीरिक हालचालीही खूप महत्त्वाच्या आहेत, अन्यथा तुमच्या शरीरातील चरबी सहजासहजी कमी होत नाही आणि ब्लोटिंग वाढू लागते. हे वाचा - टक्कल पडलेल्यांसाठी आशेचा किरण! या औषधामुळे सहा महिन्यात पुन्हा उगवणार केस सिगारेट, अल्कोहोल नको - काही वाईट सवयी असतात ज्या आपले आरोग्य बिघडवतात. बहुतांश तरुणांना सिगारेट आणि दारू पिण्याचे व्यसन लागले आहे, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहेत. या गोष्टींपासून जितक्या लवकर सुटका होईल तितके चांगले. हे वाचा - फेस पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा असा करा उपयोग, स्कीन होईल ग्लोइंग (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)