मुंबई, 24 डिसेंबर : ‘जसे अन्न, तसे मन’ अशी एक म्हण आहे. म्हणजेच माणूस ज्या प्रकारचा आहार घेतो, त्याच प्रकारचा परिणाम त्याच्या विचारांवर आणि आरोग्यावर होतो. सध्या प्रत्येकजण आपापल्या कामात इतका व्यस्त झाला आहे की पोट भरण्यासाठी काहीही खातो, मग ते जंक फूड असो किंवा रात्री उरलेले शिळे अन्न असो. रेफ्रिजरेटर 48 तासांपेक्षा जास्त काळ अन्न ताजे ठेवू शकत असले तरी, अन्न पुन्हा गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदात शिळे अन्न तामसिक मानले जाते, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीर आळशी होते असे म्हणता येईल. साधारणपणे ते शिजवल्यानंतर काही तासांतच खाल्ले गेले पाहिजे. जेणेकरुन शरीराला अन्नामध्ये असलेल्या पोषक तत्वांचा फायदा मिळू शकेल. जाणून घेऊया शिळे अन्न शरीराला कसे आळशी बनवू शकते.
Health Tips : वयाच्या 18 वर्षांनंतरही वाढू शकते तुमची उंची, फक्त करा हे उपायशिळ्या अन्नाचा शरीरावर कसा परिणाम होतो उरलेल्या अन्नाचे पौष्टिक मूल्य फारच कमी असते आणि त्याच वेळी त्यामध्ये जीवनशक्ती नगण्य असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. हेल्थशॉट्सनुसार, सतत शिळे अन्न खाल्ल्याने शरीरात सुस्ती आणि आळस येतो. काही अभ्यासांनी असेही सुचवले आहे की, जे लोक दररोज उरलेले अन्न खातात त्यांना क्लिनिकल डिप्रेशनचा धोका जास्त असतो. यामुळेच जुन्या काळी लोक नेहमी ताजे शिजवलेले अन्न खात असत. शिळे अन्न हे तामसिक अन्न मानले जाते, जे शरीरासाठी हानिकारक असते.
तामसिक अन्न म्हणजे काय तामसिक अन्न हे मुळात उर्जेची कमतरता असते. तामसिक आहारामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. अति खाणे, वारंवार अन्न गरम करणे आणि शिळे अन्न सात्विक ते तामसिक असे बदलू शकते. तामसिक अन्न निराशावाद, आळस आणि संशयाला प्रोत्साहन देते. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास महिलांनाही येतात अनेक समस्या, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका या रुल्स फॉलो करून पाहा - शिजवलेले अन्न दुसऱ्या दिवसासाठी साठवण्याऐवजी त्याच दिवशी खाण्याचा प्रयत्न करा. - जर अधिक ताजे अन्न शिल्लक असेल तर ते साठवण्याऐवजी ते गरजू लोकांमध्ये वाटा. - आवश्यक तेवढेच अन्न शिजवा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)