मुंबई, 13 जुलै : निरोगी राहण्यासाठी चांगला आहार आणि नियोजित दिनचर्येसह पुरेशी झोप देखील आवश्यक असते. झोपेचा कालावधी आणि झोपेची गुणवत्ता याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच आरोग्य तज्ज्ञ रात्री 6 ते 8 तासांची अखंड झोप घेण्याचा सल्ला देतात. मात्र चांगल्या झोपेसाठी योग्य वातावरण असणे अत्यंत आवश्यक असते. रात्री दिवे बंद ठेवून झोपणे चांगली सवय असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. जे लोक झोपताना दिवे सुरू ठेवतात त्यांना झोपेच्या समस्येचा धोका असू शकतो असे अभ्यासातून समोर आले आहे. आरोग्य तज्ज्ञांनुसार झोपेच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात आल्याने काही हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे चांगली झोप घेण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. जे लोक झोपताना दिवे सुरु ठेवतात त्यांना इतर लोकांच्या तुलनेत दररोज रात्री कमी झोप येते असे संशोधकांना असे आढळून आले आहे. अमर उजालाने या संशोधनासंदर्भातील वृत्त दिले आहे. बापरे! मेंदू कुरतडून कुरतडून घेतो जीव; व्यक्तीच्या डोक्यात घुसला Brain Eating Amoeba अभ्यासात काय आढळले? झोपेच्या गुणवत्तेवरील अभ्यासानंतर संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार झोपताना कोणत्याही प्रकारच्या प्रकाशाच्या संपर्कात आल्याने मेंदूला गाढ झोप घेण्यात अडथळा निर्माण होतो.रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशामुळे मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो. हा हार्मोन झोपेच्या गुणवत्तेसाठी आवश्यक मानला जातो. 2 मिनिटांत प्यायला संपूर्ण बाटलीभर Digestive Medicine; फक्त 100 रुपयांसाठी गमावला लाखमोलाचा जीव झोपताना लाईट सुरू ठेवल्याने काय होते नुसकसान