JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diabetes च्या भीतीने तुम्ही साखर खाणंच सोडलंत; पण याचेही होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Diabetes च्या भीतीने तुम्ही साखर खाणंच सोडलंत; पण याचेही होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

तुम्हाला माहित आहे का? साखर अचानक खाणे सोडल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा उलट परिणाम होतो आणि त्याचे काही दुष्परिणामही आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जून :  साखर खाल्ल्याने डायबेटिज होईल, अशी भीती अनेकांना असते. साखर हीवजन वाढणं, लठ्ठपणा, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या आजारांनादेखील कारणीभूत ठरते. याशिवाय, चेहऱ्यावरील मुरुम आणि इतर त्वचेचे संक्रमण, दात किडणे, कमी प्रतिकारशक्ती आणि मूड बदलणे यासह इतर विविध विकार होऊ शकतात. साखर खाण्याचे अनेक (Side Effects Of Sugar) दुष्परिणाम आहेत. साखर खाण्याच्या दुष्परिणामांमुळे आपण साखर खाणे पूर्णपणे सोडण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? साखर अचानक खाणे सोडल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा उलट परिणाम होतो (Side Effects Of Quitting Sugar). अचानक साखर खाणे बंद केल्यानंतर लोकांच्या शरीरावर तसाच परिणाम होतो जसा एखादे व्यसन सोडल्यावर लोकांच्या रोग्यावर दिसून येतो. यामुळे लवकर थकून जाणे, सतत डोकं दुखणे असा त्रास होतो ज्यामुळे आपली चिडचिड होते. साखरेचे सेवन बंद केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या शरीरात व्यापक बदल दिसून येतील. या काळात वेगवेगळी लक्षणे दिसतात आणि तुम्ही किती साखरेचा वापर करत आहात यावरही ते अवलंबून असते. साखर पूर्णपणे वगळल्यावर आपल्या शरीरावर हळूहळू परिणाम होईल.

रक्तदाब ते कॅन्सरपर्यंच्या आजारावर प्रभावी आहे हिरवी मिरची! पण, खाताना घ्या काळजी

संबंधित बातम्या

साखर आपल्या शरीरातील ग्लुकोज किंवा उर्जेचा उत्तम स्रोत असते. इन्सुलिन हे शरीरातील ग्लुकोज नियंत्रित करणारे हार्मोन आहे. साखर सोडल्याने शरीरातील अतिरिक्त इन्सुलिन कमी होऊ लागते. तुम्ही पांढरी साखर खाणे पूर्णपणे वगळू शकता. परंतु त्याजागी तुम्ही फळे, तृणधान्ये यासारखे नैसर्गिक साखरेचे स्रोत खाणे सुरू ठेवावे. जर तुम्ही साखर पूर्णपणे बंद केली तर ती तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या