Home /News /lifestyle /

रक्तदाब ते कॅन्सरपर्यंच्या आजारावर प्रभावी आहे हिरवी मिरची! पण, खाताना घ्या काळजी

रक्तदाब ते कॅन्सरपर्यंच्या आजारावर प्रभावी आहे हिरवी मिरची! पण, खाताना घ्या काळजी

दैनंदिन आहारात हिरवी मिरची (Green Chilli) जेवणाची चव वाढवते. आयुर्वेदामध्ये हिरव्या मिरचीचे औषधी गुणधर्मही सांगितलेले आहेत.

    मुंबई, 25 जून : दैनंदिन आहारात हिरवी मिरची (Green Chilli) जेवणाची चव वाढवते. मग कोणतीही भाजी असो, आमटी असो की अन्य कोणताही पदार्थ, हिरव्या मिरचीशिवाय जेवण अपूर्णच. भारतातल्या प्रत्येक स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीचा (Hiravi Mirchi) वापर ठरलेला असतोच; फक्त त्याचं प्रमाण कमी-जास्त असतं. अनेक जण हिरवी मिरची झणझणीत असल्याने खात नाहीत. मात्र आयुर्वेदामध्ये हिरव्या मिरचीचे औषधी गुणधर्मही सांगितलेले आहेत. असं असलं, तरी तिचा वापर मात्र प्रमाणात करणं गरजेचं आहे. मिरचीच्या गुणधर्मांबद्दल जाणून घेऊ या. 'झी न्यूज'ने त्याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. हिरव्या मिरचीमध्ये अ जीवनसत्त्व (Vitamin A), व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, लोह, तांबं, पोटॅशियम, प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट्स, इतकंच नाही तर बीटा कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन-झेक्सॅन्थिन इत्यादी आरोग्यदायी घटक आहेत. हिरवी मिरची खाण्याचे फायदे : - हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं - हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरवी मिरची उपयुक्त आहे. त्यात कॅप्सिसिन (Capsaicin) नावाचं संयुग असतं. ते मिरचीला मसालेदार आणि आरोग्यदायी बनवतं. कॅन्सरवर प्रभावी (Cancer) मिरचीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देऊन कॅन्सरचा धोका कमी करतात. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं हिरव्या मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारख्या पोषक तत्त्वांसह अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर ठरते. मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन असतं. ते डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. त्वचेसाठी फायदेशीर हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन-ई (Vitamin E) असल्याने त्याचा त्वचेसाठीही फायदा होतो. यामुळे चेहरा तजेलदार आणि त्वचा नेहमी सुंदर राहते. रक्तदाब नियंत्रण हिरव्या मिरचीमध्ये आढळणारं कॅप्सिसिन (Capsaicin) उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. पचनास मदत पचनसंस्था सुरळीत चालण्यासाठी हिरवी मिरचीही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. संशोधनानुसार, हिरव्या मिरचीचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकारांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो सर्दी, खोकल्यापासून आराम मिरचीमध्ये असलेलं कॅप्सिसीन (Capsaicin) नाकातली सर्दीमुळे चोंदलेली श्वसनप्रणाली मोकळी करते आणि सर्दी-खोकल्यापासून थोडा दिलासा मिळतो. वजन कमी करण्यात उपयुक्त मिरच्या आहारात असतील, तर वजन वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकते. Diabetes Tips : तुमच्या आहारात समाविष्ट करा मेथीची भाजी, Blood sugar राहते नियंत्रित हिरव्या मिरचीचे तोटे - हिरवी मिरची हे अ‍ॅसिडिटीचं कारण असू शकतं. त्यामुळे सेवन मर्यादित करणंच हिताचं. - हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने पोटात जळजळ होणं, पोट फुगणं आदी प्रकार संभवतात. - हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातली विषद्रव्यं वाढू शकतात. - दररोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त हिरव्या मिरच्यांचं सेवन केल्याने डिमेन्शियासारखी स्थिती उद्भवू शकते. -हिरवी मिरची ही फायदेशीर असली, तरी ती रोगावर इलाज नव्हे. मर्यादित प्रमाणात आहारात असावी, इतकाच याचा अर्थ आहे.
    First published:

    Tags: Health Tips

    पुढील बातम्या