JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / भारीच आहे! Coronavirus पासून बचाव करणार 'हे' बूट

भारीच आहे! Coronavirus पासून बचाव करणार 'हे' बूट

बूट (shoes) घालून कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) कसा बचाव करता येईल असा प्रश्न पडला असेल.

जाहिरात

फोटो - रॉयटर्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

क्लूज, 02 जून : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्याचा एक मार्ग म्हणजे सोशल डिस्टन्सिंग (Social distancing). मात्र कित्येक लोक त्याचं उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे हे सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी लोकं वेगवेगळ्या युक्त्या शोधू लागलेत. नुकतंच एका शू मेकरने हे सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी बूट (shoes) तयार केलेत. हे बूट घातल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल आणि तुम्ही कोरोनाव्हायरसपासून तुमचा बचा करू शकता. रॉयटर्स च्या वृत्तानुसार ट्रान्सिल्व्हेनिया शहरातील शू मेकर ग्रिगोर लूप यांनी हे बूट तयार केलेत. 55 वर्षीय लूप यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बूट बनवण्याचं काम सुरू केलं होतं. गेल्या 39 वर्षांपासून ते लेदरचे बूट बनवत आहेत. 2001 साली त्यांनी दुकान सुरू केलं, जिथं ते बूट विकू लागले. फोटो - रॉयटर्स

फोटो - रॉयटर्स

ग्रिगोर यांनी सांगितलं, “एक दिवस जेव्हा ते बाजारात गेले होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की लोकं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही आहेत. त्यावेळी त्यांनी असे लांब आकाराचे बूट तयार करण्याचा निर्णय घेतला. हे बूट घालणारी व्यक्ती समोरील व्यक्तीपासून जवळपास दीड मीटर दूर राहते. त्यांनी सांगितलं की, एक जोडी बूट बनवण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यासाठी जवळपास आठ हजार रुपये खर्च आहे” सोशल डिस्टन्सिंगसाठी मोबाइल अ‍ॅप सोशल डिस्टन्सिंगसाठी गुगलनं (google) एक नवं अ‍ॅप (app) लाँच केलं आहे.या अॅपचं नाव आहे Sodar. हे वाचा -  Social Distancing ठेवण्यासाठी मोबाइलची मदत; गुगलनं आणला नवा अ‍ॅप कंपनीने सांगितल्यानुसार हे अ‍ॅप युजर ज्या ठिकाणी आहे, तिथं सोशल डिस्टन्सिंगला व्हिज्युअलाइझ करण्यासाठी WebXR मदत घेतं. त्यानंतर ऑग्मेंटेड रिअ‍ॅल्टीच्या मदतीने दोन मीटर रेडअसची एक व्हिज्युअल रिंगही तयार करतं. स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती जसजशी सरकेल तशी ही रिंगही सरकेल. सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन झालं तर स्मार्टफोन युजर्सला अलर्ट करेल. हे अ‍ॅप गुगल स्टोरवर उपलब्ध नाही. तर क्रोम ब्राऊजरमार्फत तुम्हाला वापरता येणार आहे. हे वाचा -  कपडे असो वा कोणतीही वस्तू ‘या’ कपाटात ठेवताच व्हायरसमुक्त होणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या