मुंबई, 30 एप्रिल : शनि अमावस्येचा (Shani Amavasya) दिवस हा कर्म दाता शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्याचा एक सुंदर योग आहे. या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा करून त्यांच्या आवडीची कामे करावीत. 30 एप्रिलला शनी अमावस्या आहे. या दिवशी अशी कामं करणं टाळा, ज्यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात. ज्यांच्यावर शनिदेव रागावतात, त्यांचा कठीण काळ सुरू होतो. असं म्हटलं जातं की, त्यांच्या वक्र दृष्टितून देवांचीही सुटका झाली नाही, मग माणसाचा कुठे निभाव लागणार? तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून शनि अमावस्येच्या दिवशी कोणती कामे निषिद्ध आहेत हे जाणून घेतले. शनि अमावस्येला निषिद्ध कार्य - 1. शनी अमावस्या किंवा शनिवारी केस, दाढी किंवा नखेकापू नयेत. यामुळे दोष निर्माण होतो. 2. या दिवशी कोणत्याही भुकेल्या व्यक्तीला किंवा गरजूला रिकाम्या हाताने घराबाहेर पडू देऊ नका. त्याला खायला द्या आणि शक्य ती मदत करा. 3. जर कोणी अपंग, असहाय असेल, जो तुमच्याकडे मदतीसाठी विचारत असेल, तर त्याला मदत करण्यात अजिबात विलंब करू नका किंवा दुर्लक्ष करू नका. अशा लोकांना मदत करा, शनिदेव प्रसन्न होतील. 4. तुमच्या वडिलांचा, पालकांचा आणि शिक्षकांचा अपमान करू नका. भावा-बहिणीशी द्वेष किंवा वैर ठेवू नका. 5. कुत्रा, गाय, हत्ती, घोडा किंवा इतर प्राण्यांना कधीही इजा करू नका. तुमच्या हातून असं काही घडलं तर तुमच्यावर शनिदेवाचा कोप होऊ शकतो. हे वाचा - सोनंच पाहिजे असं नाही, अक्षय तृतीयेला तुमच्या राशीनुसार धातू खरेदी करणं फायदेशीर 6. दारू पिणे, जुगार, चोरी इत्यादी वाईट कर्मांपासून दूर राहावे. ज्यांच्यावर शनीची वाईट दृष्टी पडते त्यांच्या हातून या काही गोष्टी घडलेल्या असतात, त्यामुळं काळजी घ्या. 7. व्यभिचार, दुराचार, दुर्व्यवहार यांसारख्या चुकीच्या गोष्टींपासून आणि कर्मांपासून लांब रहा. अशा लोकांपासूनही लांबत राहा. हे वाचा - तुमच्यावरही digital detox होण्याची वेळ आलीय का बघा; मोबाईलमुळे मानसिकता धोक्यात शनिदेव कर्माचा दाता आहे. जे जसे कर्म करतात, त्यांना तसेच फळ देतात, म्हणूनच त्यांना न्यायदेवता म्हणतात. उपासना, मंत्रजप ठीक आहे, पण तुमचे आचरण, वागणूक आणि बोलणेही योग्य असले पाहिजे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर अवलंबून आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)