JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सातूला का म्हटलं जातं सुपर फूड? उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जाणून घ्या फायदे

सातूला का म्हटलं जातं सुपर फूड? उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जाणून घ्या फायदे

सुपर फूड ओळखल्या जाण्याऱ्या सातूचं पीठ तुम्ही घरीदेखील अगदी सहज तयार करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च- हिवाळा संपला की, उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागते. हिवाळ्यातील गारठ्यानंतर अचानक वाढलेली उष्णता आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे सनस्ट्रोक (Sunstroke), डिहायड्रेशन (Dehydration), घामोळे (Miliaria) यासारख्या अनेक समस्या जाणवतात. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक घरगुती पेयांचा आणि पदार्थांचा वापर केल जातो. ‘सातू’ (Sattu) हा असाच एक पदार्थ आहे ज्याचा उत्तर भारतामध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वापर होतो. सातूपासून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ (Food Items) आणि पेय (Drinks) बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात आपण या सातूच्या पीठाचा अधिक वापर करतो आणि त्यापासून विविध पदार्थ तयार करतो. सातूमध्ये असलेल्या विविध पौष्टिक (Nutrients) घटकांमुळे उन्हाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये देखील त्याचा वापर वाढला आहे. कधीकाळी ‘गरीब माणसाचं प्रोटिन’ अशी ओळख असलेल्या सातूला अलीकडच्या काळात लोकप्रियता मिळत आहे. मैद्यासारख्या दिसणाऱ्या या सातूला उर्जेचं पॉवर हाउस (Powerhouse of Energy) म्हटलं जातं. सुपर मार्केटमध्येही सहज उपलब्ध पूर्वी ठराविक राज्यांसाठी मर्यादित असलेलं सातू आता एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ झाला असून अगदी सुपर मार्केटमध्येही (Supermarkets) सहज उपलब्ध आहे. सातू आता वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यात गहू, बार्ली किंवा ज्वारी यांचा समावेश आहे. या सर्व धान्यांमध्ये ठराविक प्रमाणात भाजलेल्या हरभऱ्याचं (Roasted Gram) पीठ असतं. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात सातू उपलब्ध आहे. तुम्ही घरीदेखील अगदी सहज सातूचं पीठ तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला चणे कढईत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते थंड करून ग्राइंडरच्या मदतीनं बारीक वाटून घ्या. तुमचं होममेड सातू पीठ तयार होईल. सातूचं पीठ तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोरडे चणे भाजण्याची प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यातील पोषकद्रव्ये टिकून राहतात. विविध पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या या सुपरफूडच्या प्रत्येक 100 ग्रॅममध्ये 65 टक्के कार्बोहायड्रेट आणि 20 टक्के प्रथिने असतात. वाचा- 24 Hours Medical: नवी मुंबईत इथे मिळेल औषधांची फ्री होम डिलीव्हरी सातू आहे पौष्टिक फूड इनसॉल्युएबल फायबर (Insoluble Fibre) आणि इतर सर्व आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असलेलं सातू पौष्टिक फूड मानलं जातं. कामगार आणि शेतकरी सातूपासून तयार केलेल्या लापशीला (Sattu Porridge) (सातू, कांदा, मोहरीचं तेल, मीठ आणि हिरवी मिरची घालून बनवलेला पदार्थ) दुपारच्या जेवणात प्राधान्य देतात. सातूच्या लापशीमुळे पोट पटकन भरतं आणि उन्हात काम करण्यासाठी त्वरित ऊर्जाही (Instant Energy) मिळते. सातूमध्ये भरपूर प्रमाणात इनसॉल्युबल फायबर असल्यानं आपल्या आतड्यांसाठी ते चांगलं समजलं जातं. ते तुमचं मोठं आतडं (Colon) साफ करतं. सातूमुळे आतड्याच्या भितींमध्ये अडकलेले स्निग्ध पदार्थ काढून टाकण्यास मदत होते व संपूर्ण पचन प्रक्रिया (Digestion Process) व्यवस्थित राहते. पोट फुगणं, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीवर सातूमुळे नियंत्रण ठेवता येतं. वाचा- मध आणि आवळा एकत्र खाणं आरोग्यासाठी चांगलं, जाणून घ्या फायदे सातूमध्ये लोह, मँगनीज आणि मॅग्नेशियम या घटकांचं प्रमाण अधिक सातूमध्ये लोह, मँगनीज आणि मॅग्नेशियम हे घटक जास्त प्रमाणात असतात तर सोडियमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे झटपट ऊर्जा प्रदान करण्याशिवाय सातू कूलिंग एजंट (Cooling Agent) म्हणून देखील कार्य करतं. त्यामुळे आपल्या अवयवांना आराम मिळतो. कैरीच्या पन्ह्याप्रमाणेच, बिहार आणि झारखंडमधील हे स्थानिक पेय उन्हाळ्यातील एक परिपूर्ण पेय आहे. सातू उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट करण्यास मदत करतं. परिणामी, तुमची त्वचा टवटवीत राहते. केसांच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठीही सातूचा वापर केला जातो. त्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असल्यानं केस गळती (Hair Fall) कमी करण्यास मदत होते आणि केसांच्या मुळांमधील ऑक्सिजन प्रवाह वाढून केसांची गुणवत्ता सुधारते. टीव्ही 9 नं दिलेल्या वृत्तानुसार, जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी उन्हाळ्यात सातूचं सेवन अवश्य करावे. असं म्हटलं जातं की, वजन कमी करण्यासाठी सातू खूप प्रभावी आहे. वाचा- अनेकदा चवच समजत नाही असं होतंय का? 43 टक्के मधुमेहींना खारट-गोडाचा अंदाजच येईना सातूचा सर्वात सोपा वापर म्हणजे त्यापासून सरबत करणं सातूचा सर्वात सोपा वापर म्हणजे, त्यापासून सरबत (गोड किंवा खारट) तयार करणं. डॉक्टरांच्या मते, हे पेय सनस्ट्रोकपासून शरीराचं संरक्षण करतं. सातू, कांदा, लिंबाचा रस, काळं मीठ, जिरेपूड, चाट मसाला आणि पाणी घालून बनवलेलं हे पेय चवीला तिखट आणि मसालेदार असतं. सातूपासून गोड सरबतदेखील तयार करता येते. त्यासाठी दूध, सातू पीठ, साखर किंवा गुळाचा वापर करता येतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये याचा वापर करता येतो. सातूचा उपयोग लिट्टी, पराठे, उपमा किंवा दलिया करण्यासाठीदेखील होतो. प्रोटिन पावडरप्रमाणे दुधातही मिसळूनही सातूचं सेवन करता येतं. वाचा- केसांवर घरगुती उपाय करताना तुम्हीही अशी चूक करत नाही ना?कोंड्यानं डोकं भरून जाईल सातूचं सेवन केल्यानं ब्लड शुगर लेव्हल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत करते डायबेटिक रुग्णांच्या आरोग्यासाठी सातूतील कमी ग्लायसेमिक इंडेक्सचा (Low-glycaemic Index) फायदा होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज सातूचं सेवन केल्यानं ब्लड शुगर लेव्हल आणि ब्लड प्रेशर (Blood Pressure) कंट्रोलमध्ये राहतो. सातूमधील हाय फायबर कंटेंट कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर नियंत्रण ठेवतं आणि शरीरात चांगलं कोलेस्ट्रॉल (Cholesterol) तयार करतं.अतिशय सहज उपलब्ध होऊ शकणारं सातू अतिशय आरोग्यदायी आहे. उन्हाळ्यातील विविध समस्यांसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या