JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / भारतात येण्याआधीच रशियन लशीबाबत मोठी माहिती; ट्रायलमध्ये दिसून आले SIDE EFFECT

भारतात येण्याआधीच रशियन लशीबाबत मोठी माहिती; ट्रायलमध्ये दिसून आले SIDE EFFECT

रशियाच्या कोरोना लशीचं (russian corona vaccine) भारतात ट्रायल सुरू करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय औषध कंपनी डॉ. रेड्डीजने (Dr. Reddy’s) रशियासह करार केला आहे.

जाहिरात

सर्वात पहिले कुणाला ही लस द्यायची यावरही विचार सुरू आहे. लहान मुलांना वगळून पहिले जास्त धोका असलेल्या ज्येष्ठांना ही लस द्यायची का यावरही विचार सुरू आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॉस्को, 18 सप्टेंबर : ऑक्सफर्डच्या कोरोना लशीनंतर आता रशियाची कोरोना (Russian vaccine) लसही Sputnik V भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या लशीचं ट्रायलही लवकरच भारतात होणार आहे. यासाठी भारताच्या डॉ. रेड्डीज या औषध कंपनीने रशियान डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडसह (RDIF - Russian Direct Investment Fund) करारदेखील केला आहे. हा करार झाल्यानंतर दोन दिवसांतच रशियाच्या लशीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या लशीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. ज्या लोकांना Sputnik V लस देण्याक आली आहे. अशा सातपैकी एका व्यक्तीवर याचा दुष्परिणाम झाला आहे. लस दिल्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आहे, स्नायूंमध्ये वेदना होऊ लागल्या आहेत आणि शरीराचं तापमानाही वाढलं आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखैल मुरशाको यांनी ही माहिती दिली आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराशको यांनी सांगितलं, “40,000 पैकी 300 जणांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यापैकी जवळपास 14 टक्के जणांमध्ये सौमय अशा समस्या दिसून आल्या आहेत. लस दिल्यानंतर  24 तासांत त्यांना अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना आणि शरीराचं तापमानवाढ दिसून आलं. मात्र ही लक्षणं तात्पुरती होती” असं वृत्त रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS ने दिलं आहे. हे वाचा -  भारतात कोरोनाच्या संकटकाळात मेडिकल ऑक्सिजनाचा पुरवठा घटला, का जाणवतोय हा तुटवडा? 11 ऑगस्टला रशियाने जगातील पहिली कोरोना लस आणल्याचा दावा केला. गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युटने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या सरकारी संस्थेसह मिळून ही लस तयार केली आहे.  लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच ही लस पूर्ण तयार झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे लशीच्या सुरक्षेतबाबत आणि परिणामबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित बोत आहे. याच महिन्यात रशियामध्ये या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यात आलं आहे. पहिला डोस दिल्यानंतर 21 दिवसात आता दुसरा लस दिला जाणार आहे. हे वाचा -  श्रीमंत देशांनी आधीच केलं 51 टक्के कोरोना लशीचं बुकिंग; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा दरम्यान भारतातही या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल लवकरच होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे. रशियाने या लशीची सर्व माहितीही भारताला दिली आहे. यानंतर भारताच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने RDIF सह करार केला आहे, रशिया भारताला 10 कोटी डोस देणार आहे. त्याचं ट्रायल डॉ. रेड्डीज भारतता करणार आहे. रशियामध्ये लशीचं ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आणि भारताकडून रितसर नोंदणी झाल्यानंतर 2020 मध्येच भारताला ही लस मिळेल, असं रशियाने सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या