JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मूल झाल्यानंतरही कसं राहाल रोमँटिक ! जरूर वाचा 'या' टिप्स

मूल झाल्यानंतरही कसं राहाल रोमँटिक ! जरूर वाचा 'या' टिप्स

मूल झाल्यानंतर पती-पत्नी फक्त आई-वडील म्हणून जबाबदारी पार पाडत असतात. पती-पत्नी म्हणून त्यांचं प्रेम मागे पडलेलं असतं. एकमेकांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळही नसतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मूल झाल्यानंतर माझी पत्नी किंवा माझा पती मला पुरेसा वेळ देत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. खरं तर मूल झाल्यानंतर पती-पत्नी दोघांची प्राथमिकता असते, ते म्हणजे मूल. दोघंही फक्त आई-वडील म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतात, अशावेळी पती-पत्नी नातं कुठेतरी मागे राहतं आणि अनेकदा यामुळे दोघांमध्येही चिडचिड होते. मात्र मूल झाल्यानंतरही तुम्हाला हे प्रेम टिकवून ठेवायचं असेल तर या टीप्स जरूर वाचा समस्यांचा स्वीकार करा आपल्या मुलांना सर्वकाही मिळायला हवं यासाठी वडील भरपूर मेहनत करत असतात. तर महिलेमध्ये मुलांच्या जन्मानंतर शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. यामुळे दोघंही एकमेकांपासून दूर असतात. अशा समस्या या दोघांनीही समजून घ्यायला हव्यात. संवाद साधा मूल झाल्यानंतर पती-पत्नी आपल्यापेक्षा अधिक वेळ मुलाला देतात. एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. अशावेळी कामं वाटून घ्या, जेणेकरून कामं लवकर होतील आणि तुम्हाला एकमेकांना पुरेसा वेळ देता येईल. बाळाची काळजी घेतानाही तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. कुणाची तरी मदत घ्या काही वेळ तुम्ही मुलांना घरातील विश्वासू व्यक्तीकडे जसे की मुलाचे आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी, आत्या, मावशी यांच्याकडे डे सोडू शकता. ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेची, देखभालीची चिंता राहणार नाही आणि तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल. कुणासमोर तरी व्यक्त व्हा मुलांची काळजी घेताना तुम्हा पती-पत्नीच्या नात्यात अंतर येत असेल, समस्या येत असतील, तर नातेवाईक, मित्रमैत्रिणींना सांगा जेणेकरून ते तुमची मदत करतील. स्वत:कडे दुर्लक्ष करू नका मुलांच्या पालनपोषणात तुम्ही इतके गुंतून जाता की स्वत:कडे दुर्लक्ष करता. मुलांची देखभाल असो किंवा पती-पत्नीचं नातं टिकवणं असो जेव्हा तुम्ही स्वत:कडे लक्ष द्याल, स्वत: खूश राहाल, स्वत:ला वेळ द्याल तेव्हाच हे शक्य आहे.


अन्य बातम्या 8 लाख भारतीयांचे Extra-marital affair;  मुंबई, पुणे, नागपूरकरांचाही समावेश Live-in relationship मध्ये राहण्याचा विचार, Side effects जरूर वाचा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या