JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu: आर्थिक चणचण, अनंत अडचणी दूर करण्यासाठी तुळशीचा असा करतात उपयोग

Vastu: आर्थिक चणचण, अनंत अडचणी दूर करण्यासाठी तुळशीचा असा करतात उपयोग

घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता कधीच येत नाही. तुळशीचे काही अतिशय सोपे उपाय आहेत जे आपल्या अनेक समस्यांवर मात करू शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध तुळशीला (Tulsi) हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे आणि पूजनीय मानले जाते. असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात तुळशीचे रोप लावावे. भगवान महाविष्णूला (Lord Vishnu) तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. तसेच तुळशीशिवाय श्री हरी विष्णूलाही नैवेद्य प्राप्त होत (Tulsi benefit) नाही. इंदूरमध्ये राहणारे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगतात की, घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता कधीच येत नाही. तुळशीचे काही अतिशय सोपे उपाय आहेत जे आपल्या अनेक समस्यांवर मात करू शकतात. त्याविषयी जाणून घेऊया. तुळशी मंत्र - महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधि हर नित्यम्, तुलसी त्वं नमोस्तुते पाणी घाला जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रोग किंवा आर्थिक संकट येत असेल तर तुळशीला नियमित जल अर्पण करा आणि जल अर्पण करताना वरील मंत्राचा जप करत राहा. इच्छा पूर्ण करण्यासाठी - शरीराच्या लांबीचा एक पिवळा धागा घ्या आणि हा धागा तुळशीच्या जवळ न्या. तिथे तुमची इच्छा सांगा आणि त्या धाग्यात 108 गाठी बांधा आणि तुळशीच्या रोपाला बांधा. तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तो धागा सोडा. नकारात्मकता दूर होईल - घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 5 तुळशीची पाने उशीखाली ठेवा आणि झोपा. या उपायाने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल. हे वाचा -  शिजवलेल्या अन्नावर वरुन कच्चे मीठ घेऊ नये, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार पैसे कमावण्याचे उपाय - जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर सकाळी तुळशीची चार पाने तोडून पितळेच्या भांड्यात 24 तास पाण्यात ठेवा. 24 तासांनंतर ते पाणी घरभर शिंपडा. मुख्य गेटवरून पाणी शिंपडायला सुरुवात करा. त्याचा परिणाम तुम्ही स्वतः पाहाल. हे वाचा -  Alert! कोरोनानंतर आता आणखी एक खतरनाक व्हायरस; या लक्षणांकडे दुर्लक्ष पडेल महागात (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या