लंडन, 09 मे : अद्याप कोरोनाव्हायरसचं संकट टळलेलं नाही तोवर आणखी एका व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. कोरोनानंतर आता मंकीपॉक्स व्हायरसने (Monkeypox Virus) चिंता वाढवली आहे. यूकेमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यूकेत सापडलेला मंकीपॉक्सचा रुग्ण हा नायजेरियाहून आला आहे. त्यामुळे हा व्हायरस तिथूनच आला असं मानलं जातं आहे. ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता ठिक आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जातो आहे. जे लोक या व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत. त्यांच्या शोध घेतला जात आहे. संस्थेतील क्लिनिकड अँड एमर्जिंग इन्फेक्शन्सचे संचालक डॉ. कोलिन ब्राऊन यांनी सांगितलं की, “आम्ही रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहोचत आहोत, जेणेकरून त्यांना आवश्यक तो सल्ला देऊ शकू” हे वाचा - Corona Updates: पूर्णपणे लसीकरण होऊनही कोरोना झालेल्यांमध्ये लगेचच दिसतात ही 2 लक्षणं; असं तपासा ज्या रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू आहेत, त्या सेंट थॉमस रुग्णालयातील डॉक्टर निकोलस प्राइस यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एक व्यक्ती मंकीपॉक्स संक्रमित असल्याचा आढळला होता. यूएसमध्ये 20 वर्षांत असं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. काय आहे मंकीपॉक्स? मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ व्हायरस आहे, स्मॉल पॉक्स म्हणजे कांजण्यांप्रमाणेच असतो. यामध्येही फ्लूसारखी लक्षणं दिसतात. हा आजार गंभीर झाल्यास न्युमोनिया आणि त्यानंतर जीवघेण्या सेप्सिसचीही लक्षणं दिसू लागतात. त्यानंतर लिम्फ नोड्समध्ये सूज येते. चेहरा आणि शरीराच्या इतर भागावर दाण्यासारखे रॅशेस, पुरळ किंवा फोड येऊ लागतात. लिनोक्स हिल हॉस्पिटल न्यूयॉर्कचे डॉक्टर रॉबर्ट ग्लॅटर यांनी सांगितलं की, मंकीपॉक्ससाठीही तेच व्हायरस कारणीभूत आहेत, जे स्मॉलपॉक्ससाठी ठरतात. हे वाचा - Fatty Liver: तुमच्याही लिवरमध्ये फॅट वाढलेलं नाही ना? अशी लक्षणं जाणवतात, दुर्लक्ष नको यूकेच्या आरोग्य सुरक्षा संस्थेने सांगितल्यानुसार, हा व्हायरस सहजासहजी पसरत नाही. त्याची लक्षणंही सामान्य असतात. या व्हायरसची लागण झालेले रुग्ण काही आठवड्यातच बरे होऊ शकतात. पण रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर हा व्हायरस खतरनाक ठरू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.