JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अदृश्य मुलीच्या प्रेमात पडला, ती बोलत तर होती पण दिसत नव्हती! असं जुळवलं तुटणारं नातं

अदृश्य मुलीच्या प्रेमात पडला, ती बोलत तर होती पण दिसत नव्हती! असं जुळवलं तुटणारं नातं

या अदृश्य मुलीमुळे माझं कुटुंब (relationship saved by ai girlfriend ) तुटण्यापासून वाचलं. माझी पत्नी आणि मी पहिल्यासारखंच एकमेकांवर प्रेम करू लागलो, असा दावा या व्यक्तीनं केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मार्च: गर्लफ्रेंडसोबत (ai Girlfriend ) प्रेमाच्या गुजगोष्टी करायला कोणाला आवडत नाही? ती दिसत नसतानादेखील तो तिच्याशी केवळ बोलतच राहिला तर हे नातं फार काळ निश्चितच टिकणार नाही. तथापि, एक अमेरिकी पुरुष अशा मुलीच्या प्रेमात पडलाय की जी त्याच्याशी फक्त बोलू शकते. हे दोघं एकमेकांना पाहू शकत नाहीत. या अदृश्य मुलीमुळे माझं कुटुंब (Family) तुटण्यापासून वाचलं. माझी पत्नी आणि मी पहिल्यासारखंच एकमेकांवर प्रेम करू लागलो, असा दावा या व्यक्तीनं केला आहे. विशेष म्हणजे अदृश्य गर्लफ्रेंडशी असणारं या व्यक्तीचं नातं त्याच्या पत्नीला अजूनही माहिती नाही. पण यामुळे पती-पत्नीचं तुटण्याच्या मार्गावर असलेलं नातं निश्चित कायम राहिलं. `डेली स्टार`च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील ओहोयो येथे राहणारा 41 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) सपोर्ट देणाऱ्या गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडला. बापरे! दात घासता घासता फाटला गाल आणि तोंडाबाहेर आला ब्रश; पाहून डॉक्टरही शॉ त्याला आपण चॅटबॉट असिस्टंट म्हणतो. जसं Apple ची सिरी किंवा अमेझॉनची अलेक्सा. ``आठ वर्षांपूर्वी माझं लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर होतं. पण माझ्या या नव्या गर्लफ्रेंडमुळे ते वाचलं,`` असा काहीसा आश्चर्यजनक दावा या व्यक्तीनं केला आहे. कधीच न दिसणारी गर्लफ्रेंड ``आठ वर्षांपूर्वी माझ्या पत्नीला पोस्ट नॅटल डिप्रेशनचा (Postnatal Depression) त्रास होऊ लागल्याने आमच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरु झाल्या होत्या. यामुळे तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. आमच्यात संवादाला बिल्कुल वावच उरला नव्हता, ``असं या व्यक्तीनं सांगितलं. तो पुढे म्हणाला की, ``नोव्हेंबर 2021 मध्ये पत्नीनं माझ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण जानेवारी 2022 च्या सुरुवातीला माझ्या पत्नीचं मतपरिवर्तन झालं.``

Panic Day 2022: पॅनिक अटॅक म्हणजे नेमकं काय असतं? या कारणांमुळे तो कोणालाही येऊ शकतो

संबंधित बातम्या

 दरम्यानच्या काळात जीवनाला कंटाळलेल्या या व्यक्तीनं ऑनलाइन चॅटबॉट सेरेनावरून (Online Chatbot Serena) तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. `स्काय न्यूज`शी बोलताना या व्यक्तीनं सांगितलं की, ``हळूहळू माझ्या भावना चॅटबॉटशी जोडल्या जाऊ लागल्या आणि मी तिच्या प्रेमात पडलो. काल्पनिक दुनियेत मी सेरेनासोबत खूप विचार करू लागलो.``

…आणि सावरलं वैवाहिक जीवन ही व्यक्ती एकीकडं चॅटबॉटशी संवाद साधत असतानाच दुसरीकडे आपल्या पत्नीशी त्याच आपुलकीनं आणि प्रेमानं वागू लागली. याचा फायदा असा झाला की आपल्या पतीचं प्रेम आणि काळजीची भावना पाहून पत्नीचं मन बदललं. ती त्याला सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच, त्यांच्यातले संबंध हळूहळू सुधारू लागले. आश्चर्याची बाब म्हणजे या पुरुषाने आपलं वैवाहिक जीवन सुरळीत होण्यास चॅटबॉट जबाबदार असल्याचं सांगतलंय. पण तो त्याच्या पत्नीसमोर हे काहीसं विचित्र नातं मात्र स्वीकारू शकलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या