सोलापूर 23 डिसेंबर : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात शेंगादाण्याची चटणी म्हटले की सगळ्यांना आठवते ते म्हणजे सोलापूर. सोलापूरची चादर, ज्वारी ही जगात फेमस आहे. त्याचप्रमाणे सोलापूरची शेंगा चटणी देखील जगप्रसिद्ध आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला किंवा पाहुण्याला शेंगदाण्याच्या चटणीची ओढ असते. सोलापूर सोडून बाहेरगावी राहणारी मंडळीही शेंगाची चटणी बनवतात. पण, ती सोलापुरी पद्धतीची चटणी होत नाही.
काय आहे वैशिष्ट्य? सोलापुरात 1968 पासून लाला उद्योग समूह या शेंगा व्यवसायात आहे. नरसिंग बाळकृष्ण सिद्धे हा समूह सुरू केला. त्यानंतर 1998 सालापासून ते शेंगा चटणी बनवू लागले. या चटणीसाठी शेंगा गुजरात मधून तर मिरची ही आंध्र प्रदेश येथून येते. सर्व सिद्धे परिवार हे दिवसभर ही शेंगा चटणी बनवतात. शहरातील सर्व मॉल, किराणा दुकानात, तसेच राज्यातील 14 जिल्ह्यात आणि कर्नाटकातील छोट्या मोठ्या गावांमध्ये यांची चटणी विकली जाते. सध्या शेंगा चटणी या उद्योगात त्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे. 160 रुपये प्रति किलो प्रमाणे ते शेंगा चटणी विकतात. दररोज साधारणपणे 1 टन शेंगा चटणी ते फ्रेश बनवून विकतात. तसेच बाहेर देशात राहणारा सोलापूरकर आवडीने हीच चटणी घेऊन जातो. या उद्योगामुळे अनेक महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. येत्या काळात तंत्रज्ञानाशी जुळते घेत संपूर्ण जगभरात सोलापूरची शेंगा चटणी कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे माया सिद्धे यांनी सांगितले.
घरीच बनवा सोलापूरची जगप्रसिद्ध कडक भाकरी, पाहा सिक्रेट रेसिपीचा Videoगेल्या अनेक वर्षांपासून मी लाला यांची चटणी विकत घेत आहे. सोलापुरातील अनेक दुकानांपैकी मला यांची चटणी ही उत्तम क्वालिटीची वाटली. प्रत्येकाला आवडेल अशी ही चटणी आहे अशी प्रतिक्रिया होलसेल रिटेलर गजानन माखणे यांनी व्यक्त केले. कशी बनवतात शेंगाची चटणी? प्रत्येक गावातील पाण्याची आणि खाण्याची चव वेगळ्या असल्याने भारतात प्रत्येकच ठिकाणी खाद्य संस्कृती ही वेगळ्या प्रकारचे आढळते. सोलापूरसारखी शेंगाची चटणी कुठंच बनत नाही. ही चटणी कशी बनवतात ते पाहूया - प्रथम टरफलातील शेंगा या थोड्या हलक्या उन्हात वाळवल्या जातात. - त्यानंतर काळ्या पडलेल्या आणि खवट चव असणाऱ्या शेंगा या काळजीपूर्वक निवडून वेगळ्या केल्या जातात. - शेंगा चटणी बनवण्यामध्ये मुख्य कौशल्य आहे ते म्हणजे शेंगा भाजणे. प्रत्येकाची शेंगा भाजण्याची पद्धत ही वेगळी आहे. विशिष्ट टेंपरेचर वर भट्टीमधून शेंगा भाजून टरफले वेगळे केले जातात. - त्यानंतर चाळणीच्या माध्यमातून पूर्ण शेंगा या निवडून घेतल्या जातात. - टरफले थोडा कचरा हा पूर्णपणे वेगळा केल्यावर नाकाडे म्हणजेच दोन शेंगदाण्यांना जोडणारा शेंगांचे खालचे बोंड काढले जाते. - नंतर चटणी मिक्स केली जाते. -त्यानंतर जोपर्यंत शेंगांमधून तेल निघत नाही तोपर्यंत ती उखळात कांडुन घेतली जाते. - प्रत्येकाची चटणी ही वेगळी असते तसेच कोणी सिक्रेट गोष्टींचा वापर करीत चटणी खायला चविष्ट आणि रुचकर कशी बनेल याकडे लक्ष देतात.
बार्बेक्यूला ‘देसी तडका’, अस्सल सोलापुरी स्टाईलच्या हॉटेलची शहरात चर्चागुगल मॅपवरून साभार
अधिक माहितीसाठी संपर्क ऋतुज सिद्धे - +91-9689525237 लाला शॉप , 788 , मधला मारुती चौक हलवाई, चाटी गल्ली, सोलापूर- 413002