JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / खान्देशातील अस्सल झणझणीत मसाला खिचडी कशी तयार करणार? पाहा Recipe Video

खान्देशातील अस्सल झणझणीत मसाला खिचडी कशी तयार करणार? पाहा Recipe Video

Khandeshi Masala Khichadi : खान्देशातील या जिल्ह्यांमध्ये खिचडी हा रोजचा आहार आहे. खान्देशातील प्रसिद्ध मसाला खिचडी कशी तयार करायची ते आपण पाहूया

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जानेवारी : राज्यातील वेगवेगळ्या भागातील खाद्य संस्कृतीची एक खासियत आहे. त्या भागातील हवामानाला, भौगोलिक परिस्थितीला पोषक असे पदार्थ निरनिराळ्या भागात बनतात. धुळे, नंदूरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांच्या खान्देश परिसरातही खाद्यसंस्कृती श्रीमंत आहे. खान्देशातील या जिल्ह्यांमध्ये खिचडी हा रोजचा आहार आहे. खान्देशी घरांमध्ये अनेक पद्धतीनं खिचडी होते. साधी खिचडी, मसाला खिचडी, दालखिचडा अशा वेगवेगळ्या प्रकारे खिचडी केली जाते. नंदूरबारच्या नेहा पाटील यांनी खान्देशी मसाला खिचडी करण्याची पद्धत सांगितली आहे. खिचडीसाठी लागणारे साहित्य आणि प्रमाण 1)तांदूळ- दोन कप 2)तुरीची किंवा मुगाची डाळ- एक कप. 3)लसणाचे तुकडे आठ ते दहा पाकळ्या 4)शेंगदाणे 5 सुकलेल्या लाल मिर्ची - दोन 6)मोहरी जिरे प्रत्येकी- एक चमचा . 7) हिंग चिमूटभर. 8)हळद ,तिखट ,मीठ चवीनुसार . 9)खडा मसाला पावडर 10)कोथिंबीर 11) कांदा 12)तेल फोडणीसाठी अगदी सोप्या पद्धतीनं घरीच बनवा खान्देशी लांडगे, पाहा Video खिचडी कशी करावी? सर्वप्रथम लाल तिखट, हळद, लसूण, खडा मसाला खलबात्त्यात कांडून घ्यावा.कुकरमध्ये तेल तापवावे. त्यात मोहरी, लसणाचे तुकडे, जिरे ,मिर्ची,शेंगदाणे, कांदा आणि कांडलेला मसाला टाकून छान परतावे . फोडणीत दाळ तांदूळ परतवून घ्यावे आणि तांदूळ भिजून एक इंच वरपर्यंत पाणी टाकावे. छान उकळी आल्यावर कुकरचे झाकण बंद करावे. चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार कोथिंबीर टाकावी. झाकण लावून मंद आचेवर शिजवून घ्यावे .गरमागरम खिचडीवर तूप किंवा शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकून कढी बरोबर सर्व्ह करावे.मुगाच्या डाळी ऐवजी तुरीची डाळ चवळीची डाळ सुद्धा खिचडीसाठी वापरू शकतो.

‘पूर्वीच्या काळी घरोघरी 4 वाजले की चुली पेटायच्या आणि विस्तवावर एका पातेल्यात खमंग खिचडी तयार होत असे. आता चुलीची जागा गॅसनं घेतली असली खिचडीची लोकप्रियता कायम आहे. काही भागांमध्ये आजही चुलीवरीची खिचडी केली जाते. ही खिचडी खाल्ल्यावर थकवा गेल्यासारखं वाटतं,’ असं पाटील यांनी सांगितलं. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या