नगरच्या कढी वड्याची सिक्रेट रेसिपी

हॉटेलमध्ये विविध पदार्थ नेहमीच आपल्याला खायला मिळतात. प्रत्येक हॉटेलच्या पदार्थांची चव वेगळी आणि ते तयार करण्याची पद्धतही वेगळी असते. 

आपापल्या परिसरात काहीकाही हॉटेलच्या पदार्थांची ओळख तयार झालेली असते. खूप दूरवरून लोक ते पदार्थ खाण्यासाठी येतात. 

नगरमधील कढी वड्याची अशीच वेगळी ओळख असून हा पदार्थ आता महाराष्ट्रात फेमस झाला आहे. 

तिखट आणि गोड अशी चव देणारा कढी वडा हा अनेकांच्या जिभेवरती रेंगाळत राहतो.

अमोल सुरसे यांची आई नेहमी घरात कढी वडा बनवत असे, हा कढी वडा कुटुंबातील अनेकांना आवडत असल्यामुळे आपण नगरकरांना देखील कढी वडा खाऊ घालू, म्हणून चौपाटी कढी वडाची सुरुवात झाली.

 वड्यासाठी कांदा लसणाचा वापर केला जात नाही. 

 काजू, बदाम, खसखस, मगजबीज, मनुके यांचा वापर केला जातो. सोबत दह्याची बनवलेली कढी असते. एक कढी वडा पोट फूल करतो.