JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अरे बापरे! 3114154015... महिन्याचं अब्जावधीचं Electricity bill पाहताच ग्राहकाला शॉक

अरे बापरे! 3114154015... महिन्याचं अब्जावधीचं Electricity bill पाहताच ग्राहकाला शॉक

आधीचं कोणतंही वीज बिल (electricity bill) शिल्लक नाही तरीदेखील या व्यक्तीला बिल कसं काय आलं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 12 जानेवारी : कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान तसा अनेकांना विजेचा झटका बसला. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच आपलं लाइट बिल (light bill) पाहून शॉक बसला. कधी विचारही केला नसेल इतकं लाइट बिल (electricity bill) आलं होतं. हजारोंपर्यंत वीज बिल ठिक आहे पण एखाद्याला अब्जावधीमध्ये बिल आलं तर… 3114154015… आकडा वाचतानाच दमछाक झाली आहे पण हा आकडा वीज बिल असल्याचं तुम्हाला कुणी सांगितलं तर… काय जोर का झटका बसला ना? ज्या व्यक्तीला हे वीज बिल आहे, त्याला तर मोठा शॉक बसला आहे. राजस्थानमधील (rajasthan) एका कंपनीचं हजारो, लाखो नाही तर तब्बल अब्जावधीचं लाइट बिल आलं आहे. एरवी 10-20 हजार रुपये रकमेच्या ठिकाणी 3114154015 आकडा पाहून कंपनीच्या संचालकाला धक्काच बसला. त्यातही 25 जानेवारीपर्यंत हे वीज बिल भरलं नाही तर पावणे सहा कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचंही सांगितलं आहे. हे वाचा -  डोंबिवलीतील एका हॉटेलात भयानक स्फोट; साध्या कुकरमुळे झाला सत्यानाश नवभारत टाइम्स च्या वृत्तानुसार भिवाडीतील डीजल पॉवर इंटरनॅशनल कंपनीचं बिल 3 अब्ज 11 कोटी 41 लाख 54 हजार 15 रुपये आलं आहे. बिलाचा आकडा पाहून मालक अनिता शर्मांना धक्काच बसला. जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेडनं (jvvnl) पाठवलेलं हे बिल.  अनिता यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीशी संपर्क केला. तेव्हा कॉम्प्युटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हीव्हीएनएलच्या नवं बिल मागवण्यात आलं. नव्या बिलात ही रक्कम  226134 रुपये झाली. हे वाचा -  महाराष्ट्रात उद्योगांना मिळणार स्वस्त दरात वीज? मोठा निर्णय होण्याची शक्यता एकतर वीज कंपनीच्या प्रणालीत त्रुटी, त्यात तब्बल दहापट जास्त बिल आकारण्यात आलं होतं. हे पाहून अनिता यांना धक्काच बसला. एकंदचर या वीज कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या