डोंबिवलीतील एका हॉटेलात भयानक स्फोट; साध्या कुकरमुळे झाला सत्यानाश

डोंबिवलीतील एका हॉटेलात भयानक स्फोट; साध्या कुकरमुळे झाला सत्यानाश

ठाकुर्ली स्टेशन (Thakurli station)परिसरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा (Cooker) भयानक स्फोट (Blast) झाला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, याामध्ये हॉटेलच्या मालकाला (Hotel owner) गंभीर दुखापत (Deadly injured) झाली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 12 जानेवारी: ठाकुर्ली स्टेशन (Thakurli station) परिसरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा (Cooker) भयानक स्फोट (Blast) झाला आहे. या स्फोटाची तिव्रता इतकी प्रचंड होती की, याामध्ये हॉटेलच्या मालकाला गंभीर दुखापत (Deadly injured) झाली आहे. कलय्या स्वामी सेलवन असं या 40 वर्षीय हॉटेल मालकाचं नाव आहे. जखमी मालकावर (Hotel owner) सध्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सदर हॉटेल डोंबिवली नजीकच्या ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरात आहे. या हॉटेलचं नाव 'हॉटेल सौभाग्य न्यू किचन' असं आहे. सारस्वत कॉलनीतील विजय गुरूप्रेम सोसायटीत राहणारे कलय्या आणि त्यांची पत्नी मयुरी हे दाम्पत्य सदर हॉटेल चालवते. शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, तसेच पार्सलची सुविधा देखील या हॉटेलमधून दिली जाते. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका ग्राहकाने चिकन हंडीची ऑर्डर दिली होती.

यावेळी कलय्या स्वामी हे स्वतः चिकन हंडीसाठी लागणारं मांस एका ऍल्युमिनियमच्या कुकरमध्ये टाकून शिजवत होते. मात्र काही वेळानं या कुकरचा कानठळ्या बसतील एवढ्या जोरात स्फोट झाला. या स्फोटात कुकरच्या उडालेल्या झाकणाने कलय्या स्वामी गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्याला जबरदस्त मार बसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळले. या स्फोटाच्या आवाजाने आसपासच्या लोकांनी मोठा गलका केला आणि सर्वजण या हॉटेलकडे धावत आले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत पडलेल्या कलय्या स्वामी यांना स्थानिकांनी त्वरित शिवम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमी कलय्या स्वामी आणि पत्नी मयुरी सेलवन (वय-35) यांचा जाब नोंदवून घेतला आहे. या संदर्भात हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे चौकशी केली असता, जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं समजलं. हॉटेल मालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचेही डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणाची रामनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप एगडे करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 12, 2021, 8:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading