JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / भन्नाटच! पावसाळ्यात रात्रभर सॉक्समध्ये कांद्याच्या स्लाइस ठेवा आणि बघा चमत्कार; होतील हे फायदे

भन्नाटच! पावसाळ्यात रात्रभर सॉक्समध्ये कांद्याच्या स्लाइस ठेवा आणि बघा चमत्कार; होतील हे फायदे

हा उपाय विचित्र वाटत असला, तरी कित्येक वर्षांपासून हा उपाय केला जात आहे. याबद्दलची थोडी माहिती जाणून घेऊ या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै:  कांदा हा आहारातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चटपटीत स्नॅक्स पदार्थांपासून मुख्य जेवणाचा भाग असलेल्या आमट्या-भाज्यांपर्यंत सगळ्या पदार्थांमध्ये कांदा घातला जातो. त्यामुळे पदार्थांना खास स्वाद तर येतोच; पण कांद्यात (Onion Medicinal Properties) औषधी गुणधर्मही असल्याने तो शरीरालाही उपकारक ठरतो. लाल कांद्यापेक्षा पांढरा कांदा अधिक औषधी असतो, असंही सांगितलं जातं; पण कांदा केवळ खाल्ल्यामुळेच नव्हे, तर त्याच्या सहवासानेही काही व्याधी दूर होऊ शकतात, असं पारंपरिक उपचारपद्धती सांगते. लाल कांद्याच्या चकत्या करून त्या रात्रभर आपल्या मोज्यांमध्ये घालून झोपलं, तर ताप, सर्दी आणि अन्य आजार बरे होऊ शकतात, असं म्हटलं जातं. हा उपाय विचित्र वाटत असला, तरी कित्येक वर्षांपासून हा उपाय केला जात आहे. याबद्दलची थोडी माहिती जाणून घेऊ या. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबद्दल माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कांद्याच्या स्लाइस सॉक्समध्ये (Onion Slices in Socks) ठेवण्याचा उपाय जरा विचित्रच वाटतोय ना? पण हा उपाय आजच्या काळात नव्हे, तर 15व्या शतकाच्या सुरुवातीपासून वापरला जातोय. त्या उपायाचा उपयोग होत असला, तरीही त्याचा प्रभाव नेमका किती आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीमधल्या फूड सायन्स अँड ह्युमन न्यूट्रिशन विभागातल्या प्राध्यापक डॉ. रुथ मॅक्डोनाल्ड यांनी एका मेडिसिन जर्नलमध्ये असं म्हटलं आहे, की ‘ब्लीच किंवा केमिकल अँटिबायोटिक्सच्या तुलनेत कांद्यांचा प्रभाव खूपच कमी आहे. विषाणूंचा संसर्ग पसरण्यासाठी मानवी शरीराशी त्यांचा थेट संपर्क यावा लागतो. त्यामुळे विषाणू, तसंच संसर्गावर कांदे प्रभावी ठरणार नाहीत.’ तुमच्या मुलाच्या मनात स्पर्धेची भीती नाही ना? अशी दूर करा मुलांची एन्झायटी

कांदे सल्फरसारख्या खनिजांनी समृद्ध असतात, तसंच त्यात चांगले अँटीबॅक्टेरियल (Antibacterial) गुणधर्मही असतात. त्यामुळे कांदे आहारात योग्य प्रमाणात असतील, तर त्यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो, असं आधुनिक शास्त्रातून सिद्ध झालेलं आहे.

पुरातन काळापासून चालत आलेला उपाय नेमका काय? कांदे अर्धे कापून किंवा त्यांच्या चकत्या करून रात्री झोपताना सॉक्समध्ये ठेवण्याचा उपाय 15व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू झाला. तेव्हा जग बबॉनिक प्लेगच्या महाभयंकर साथीला तोंड देत होतं. सर्दी, ताप आदी अनेक रोग बरे करण्याची, तसंच बबॉनिक प्लेगला प्रतिबंध करण्याची क्षमता लाल कांद्यांमध्ये आहे, असं त्या काळी मानलं जाई. नॅशनल ओनियन असोसिएशनच्या माहितीनुसार, त्या वेळी असा समज होता की संसर्ग विषारी हवेतून पसरतात. कांद्याचा वास उग्र असल्याने विषारी हवेमुळे होणाऱ्या संसर्गाला प्रतिबंध करण्याची क्षमता त्यात असेल, असं मानलं जाई. केवळ पाश्चिमात्य देशांतच नव्हे, तर आशियातही असं मानलं जाई, की सॉक्समध्ये कांदे ठेवले, तर शरीर स्वच्छ होतं, प्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्ग व रोगांशी शरीर लढा देतं. फूट रिफ्लेक्सॉलॉजी (Foot Reflexology) या प्राचीन चिनी पद्धतीशीही याचा संबंध जोडला जातो. शरीरातल्या सर्व महत्त्वाच्या इंद्रियांच्या नर्व्ह्ज पायाशी निगडित असतात. त्यामुळे पायाजवळ कांदा ठेवल्याने शरीर आतून बरं व्हायला मदत होते. आजही ही पद्धत अनेक ठिकाणी वापरली जाते. कांद्यांमध्ये फॉस्फोरिक अ‍ॅसिड (Phosphoric Acid) असतं. जेव्हा कांद्याच्या मानवी शरीराशी संपर्क येतो, तेव्हा सॉक्समध्ये ते अ‍ॅसिड तयार होतं. त्यातून तयार झालेली उष्णता रक्तवाहिन्यांमध्ये जाते. त्यातून रक्तशुद्धीकरणाला चालना मिळते आणि रक्ताभिसरणही सुधारतं. डेस्क जॉब करणाऱ्यांना जास्त असतो हृदयविकाराचा धोका, तज्ज्ञांनी सुचवले हे उपाय

शरीरातल्या गुंतागुंतीच्या मज्जासंस्थेतल्या नर्व्ह्जचं एक टोक पायात असतं. त्यामुळे रात्रभर सॉक्समध्ये कांदे ठेवल्यास अंतर्गत आजार बरे होण्यास मदत होते. विषद्रव्यं शोषून घेतली जातात. योग्य प्रेशर पॉइंट्सच्या ठिकाणी कांद्याच्या स्लाइस ठेवल्यास अधिक चांगला उपयोग होतो

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या