JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शुद्ध औषधी मसाला म्हणजे काळी मिरी; यामुळेच इंग्रजांचा 200 वर्षे 'गुलाम' राहिला भारत

शुद्ध औषधी मसाला म्हणजे काळी मिरी; यामुळेच इंग्रजांचा 200 वर्षे 'गुलाम' राहिला भारत

दहाव्या शतकापर्यंत युरोपातही काळ्या मिरीची मागणी झपाट्याने वाढू लागली. त्याची वाढती मागणी आणि अवाजवी किंमत यामुळे हे काळे सोने (Black Gold) चलन म्हणूनही वापरले जात होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 एप्रिल : काळी मिरी हा भारतीय मसाला असून याबद्दल कसलाही संभ्रम असण्याचं कारण नाही. हा मसाल्याचा पदार्थ कोणत्याही भाजीमध्ये घातल्यास चव चांगली येते आणि अन्न पौष्टिक बनतं, म्हणूनच याला औषधी मसाला असेही म्हणतात. काळी मिरी काही विशेष मसाल्यांपैकी एक आहे, ज्याचा भारतीय स्वयंपाकघरात प्राचीन काळी ऋषीमुनींनी समावेश केला होता, कारण त्यात शरीर निरोगी ठेवण्याचे अनेक गुणधर्म आहेत. काळी मिरी चलन म्हणूनही वापरली (History of Black Pepper) गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काळ्या मिरीमुळे भारत 200 वर्षे इंग्रजांचा ‘गुलाम’ राहिला. भारतात काळी मिरी प्रथम दक्षिण भारतात आली. त्याचे कारण म्हणजे भौगोलिक स्थान आणि सागरी वारे हे वाढण्यास अनुकूल आहेत. आपण इतकेच म्हणू शकतो की सुमारे 4 हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या तामिळ साहित्यात आणि संस्कृत साहित्यात काळ्या मिरीचे वर्णन आहे. इसवी सन पूर्व सातव्या-आठव्या शतकात लिहिलेल्या ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथात काळ्या मिरीला ‘मरिचम’ असे म्हटले आहे. सुश्रुत संहितेच्या दुसर्‍या एका प्राचीन ग्रंथात याला ‘वेल्लज’ असे नाव देऊन अतिशय लाभदायक आहे, असे वर्णन केले आहे. चलन म्हणून काळी मिरी वापरली - भारताबाहेर बोलायचे झाल्यास इजिप्तमध्ये 2,500 ईसापूर्व लोकांच्या दफनादरम्यान, त्यांच्या कबरीमध्ये मिरपूड ठेवली जात होती. त्याचे वर्णन ग्रीस, रोम, पोर्तुगीज संस्कृतींमध्ये आढळते. पूर्व मध्ययुगीन काळात काळी मिरी खूप मौल्यवान मानली जात होती. यावेळी त्याला ‘काळे सोने’ असेही म्हटले जात असे. दहाव्या शतकापर्यंत युरोपातही काळ्या मिरीची मागणी झपाट्याने वाढू लागली. त्याची वाढती मागणी आणि अवाजवी किंमत यामुळे हे काळे सोने (Black Gold) चलन म्हणूनही वापरले जात होते. ब्रिटानिकामध्ये (Britannica) असे नोंदवले गेले आहे, की इंग्लंडचा राजा एथेलरेड-II (ए.डी. 978-1013) याने व्यापार करण्यापूर्वी जर्मन मसाल्याच्या व्यापाऱ्यांकडून 10 पौंड मिरपूड गोळा केली. भारतात मसाल्यांचा व्यवसाय - भारताला इंग्रजांचे गुलाम बनवण्यात काळ्या मिरीचेही योगदान आहे. पोर्तुगीज नेव्हिगेटर वास्को द गामा काळ्या शोध घेत दक्षिण भारतातील कालिकत किनारपट्टीवर पोहोचला (इ.स. 1498). त्यानंतर पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी मसाल्यांचा व्यवसाय खूप पसरवला. त्यांना पाहून डच व्यापारी दक्षिण भारतात दाखल झाले. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली. मसाल्यांचा व्यवसाय करत असताना भारताची राजकीय आणि सामरिक व्यवस्था कमकुवत होत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी भारत ताब्यात घेतला आणि 200 वर्षे गुलाम म्हणून ठेवले. काळी मिरी शरीर निरोगी ठेवते - ‘चरकसंहिता’च्या ‘अहार योगीवर्ग’ या अध्यायात वात-कफ जिंकणारा, ताकद वाढवणारा आणि जेवणाला चविष्ट बनवणारे, असे काळ्या मिरीचे वर्णन केले आहे. वैद्यराज प्रशांत बोंद्रे यांच्या मते काळी मिरी ही केवळ मसाल्यांची राणी नाही तर ती आरोग्यासाठी रामबाण औषध आहे. त्यामुळे भूक वाढते, अन्नाचे पचन होते, यकृत निरोगी होते, तसेच पोटदुखी व पोटातील जंत दूर होतात. तिखट आणि उष्ण असल्याने तोंडात लाळ निर्माण होते आणि शरीरातील सर्व स्त्रोतांमधील घाण काढून स्त्रोत पोट शुद्ध करते. मात्र, जास्त प्रमाणात खाल्ल्यास होणारे नुकसान म्हणजे त्वचेला खाज येते आणि पोटातील पचनसंस्थेला त्रास होतो. हे वाचा -  तुमचं मूल अजून लाळ गाळतंय का? समज-गैरसमज खूप आहेत, नेमकी माहिती समजून घ्या अमेरिकेत सर्वाधिक काळी मिरी खाल्ली जाते - काळी मिरी उत्पादनात भारत एकेकाळी पहिल्या क्रमांकावर होता. पण आता तसे नाही. ताज्या माहितीनुसार, व्हिएतनाम जगभरात मिरपूड पिकवण्यात अग्रेसर आहे. त्यानंतर इंडोनेशिया आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. यानंतर, ब्राझील आणि चीन सर्वात जास्त मिरपूड पिकवतात. जगातील 20 टक्के मसाल्यांचा व्यवसाय काळ्या मिरीचा आहे. विशेष म्हणजे सर्वच देश काळी मिरी खाण्यात फारसा रस दाखवत नाहीत. अमेरिकेत काळी मिरी जास्त खाल्ली जाते. एका अंदाजानुसार, जगात उत्पादित होणाऱ्या एकूण काळी मिरीपैकी 18 टक्के काळी मिरी अमेरिका वापरते. या मसाल्याचा हा देश सर्वात मोठा आयातदार आहे. हे वाचा -  Gourd benefit: दुधी भोपळा खाण्याचे हे आहेत 5 फायदे; अनेक आजार आपोआप कमी होतात काळ्या मिरीला भारतातील इतर भाषांमध्ये विविध नावे आहेत, जसे की गुजरातीमध्ये मारितिखा, ओरियामध्ये कांचा गोट मिर्चा, कन्नडमध्ये ओले मोन्सू, तेलुगूमध्ये मारिचामु, तामिळमध्ये मिलागू, मल्याळममध्ये कुरु मूलक, बंगालीमध्ये गोल मोरिच, काली मिरिन. मराठीत काळी मिरी इंग्रजीत - Black Pepper

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या