JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गरोदरपणात हेअर डाय वापरताय? मग हे दुष्परिणाम तुम्हाला माहिती असायलाच हवे

गरोदरपणात हेअर डाय वापरताय? मग हे दुष्परिणाम तुम्हाला माहिती असायलाच हवे

केसांना कलर करणं आजकाल प्रत्येक वयोगटात सामान्य झाले आहे, मात्र गर्भधारणेदरम्यान ते काळजीपूर्वक वापरावे. प्रेग्नन्सीदरम्यान आवश्यक खबरदारी घेऊनच केसांवर हेअर डाय वापरावे.

जाहिरात

गरोदर महिलांनी केस कलर करावे की नाही?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जानेवारी : गर्भधारणे दरम्यान स्त्रियांना सर्वकाही काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी आईच्या प्रत्येक कामाचा परिणाम मुलाच्या आरोग्यावर होतो. अशा स्थितीत आहार असो वा कोणतीही शारीरिक क्रिया, त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंकडे पाहणे आवश्यक ठरते. हेअर डायसारख्या किरकोळ गोष्टीचाही मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेकदा महिलांना हेअर स्टाइल करायला आवडते. केसांसाठी वेगवेगळे डाय वापरणे आजकाल फॅशनेबल झाले आह. परंतु अमोनिया, कोल टार, टोल्युइन आणि रेसोर्सिनॉल यांसारख्या धोकादायक रसायनांनी तयार केलेले हेअर डाय गर्भधारणेदरम्यान हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सीदरम्यान आवश्यक खबरदारी घेऊनच केसांवर हेअर डाय वापरावे.

आई झाल्यानंतर तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टी विसरायला लागलात? पाहा काय आहे ‘मॉमी ब्रेन’ प्रॉब्लेम

संबंधित बातम्या

गरोदर महिलांनी केस कलर करावे की नाही? StyleCraze.com नुसार, हेअर डायमध्ये असलेले रसायन बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. डायमध्ये आढळणाऱ्या पी-फेनिलेनेडायमिनमुळे जन्मजात दोष आणि लिव्हरच्या समस्या उद्भवू शकतात. डायमध्ये वापरल्या जाणार्‍या अमोनियासारख्या हानिकारक रसायनांमुळे हार्मोनल असंतुलन आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात.

एनसीबीआयच्या संशोधनानुसार, आईने हेअर डाय वापरल्याने मुलामध्ये न्यूरोब्लास्टोमाचा धोका वाढतो. याशिवाय डायच्या वापरामुळे मुलांमध्ये जर्म सेल ट्यूमरसारख्या गंभीर समस्या होण्याची इच्छा देखील वाढू शकते. हेअर डाय बाळासाठी हानिकारक आहे की नाही हे त्यातील रसायने आणि वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. गर्भवती महिलांनी हेअर डाय लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात - वापरण्यापूर्वी डायमधील घटक वाचा. हानिकारक रंग निवडण्याऐवजी केसांचे नैसर्गिक रंग वापरणे चांगले. - चेहरा, मान आणि कानाची त्वचा टाळून नेहमी डाय वापरा. त्वचेपासूनचे अंतर हानिकारक रसायनांपासून वाचवू शकते. - अॅलर्जी किंवा इतर कोणतीही समस्या टाळण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उत्पादन किंवा डाय वापरू नका. गरोदरपणात आयर्न कॅप्सूल घेतल्याने खरंच बाळाच्या रंगावर परिणाम होतो का? वाचा तज्ज्ञांचं मत (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या