इनफर्टिलिटीच्या समस्येसाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश
मुंबई 9 जानेवारी : आई-वडील होणं हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण असतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना पालक बनण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सध्याच्या काळातील जीवनशैलीमुळे अनेकांना इनफर्टिलिटीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यासाठी विस्कळीत जीवनशैली, पौष्टिक आहाराचा अभाव, हार्मोनल असंतुलन, शुक्राणूंची कमी संख्या आणि अंड्यांचा खराब दर्जा अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ‘आज तक’ने यासंदर्भात एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यानुसार दर 5 पैकी एका व्यक्तीला गर्भधारणा होण्यात अडचण येत असल्याचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (CDC) अहवालात म्हटले आहे. अशा परिस्थितीत जीवनशैलीत आणि आहारात काही आवश्यक बदल करून वंध्यत्वाची समस्या दूर करता येऊ शकते. आज या लेखातून आपण अशा काही पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि त्यांचा नियमित आहारात समावेश करून तु्म्ही वंध्यत्वाच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
Pregnancy Tips : प्रेग्नन्सीमध्ये चिंच खाणं ठरू शकतं फायदेशीर! बाळाला होतात ‘हे’ फायदेवंध्यत्व घालवण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश दुग्धजन्य पदार्थ अनेक अभ्यासांमध्ये दुग्धजन्य पदार्थ गर्भधारणेसाठी योग्य मानले जात नाहीत. एक अभ्यासानुसार दुग्धजन्य पदार्थं खाल्ल्याने जळजळ होण्याची समस्या वाढू शकते आणि गर्भधारणा होण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. परंतु अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या जर्नलमधील अभ्यासानुसार दुग्धजन्य पदार्थ काही प्रकरणांमध्ये ते सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. या अभ्यासानुसार ज्या स्त्रिया ओव्हुलेटरी वंध्यत्वाचा सामना करत आहेत त्यांनी फॅटयुक्त दुधाचे सेवन केले तर ते ही समस्या टाळू शकतात.
सार्डिन फिश सार्डिन फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, हाय प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे गर्भधारणेसाठी मदत होते. द जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझमच्या 2018 मधील अंकातील रिपोर्टनुसार आहारात सार्डिन माशाचा समावेश केल्याने गर्भधारणेला मदत होतेच शिवाय महिला आणि पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्याही दूर होते. ओट्स ओट्समध्ये व्हिटॅमिन बी, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांसाठी ओट्स अतिशय फायदेशीर ठरू शकतात. ओट्स खाल्ल्याने महिलांची एंडोमेट्रियल लाइन म्हणजेच गर्भाशयाच्या आतील थर जाड होतो. टोमॅटो वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणाऱ्या पुरुषांसाठी टोमॅटो अतिशय फायदेशीर ठरू शकतात. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते. यासाठी पुरुषांनी टोमॅटो शिजवून खाणे आवश्यक आहे. तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही लायकोपीन घटक आढळणारे पदार्थ खाऊ शकता. यासाठी टरबूज आणि लाल शिमला मिरची हे पर्याय आहेत. प्रेग्नन्सीमध्ये हाता-पायांवर सूज येणं सामान्य आहे का? कधी घ्यावी डॉक्टरांची मदत अक्रोड पुरुषांनी 3 महिन्यांपर्यंत दररोज 42 ग्रॅम अक्रोडा खाल्ल्यास त्यांची वंध्यत्वाची समस्या दूर होऊ शकते अक्रोडमध्ये प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडसह अनेक पोषक घटक आढळतात. अक्रोड खाल्ल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते, तसेच महिलांमधील वंध्यत्वाची समस्याही दूर करण्यास मदत करते.