JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pregnancy Tips : गरोदरपणात भात खावा की नाही? White की Brown कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर

Pregnancy Tips : गरोदरपणात भात खावा की नाही? White की Brown कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर

बऱ्याचदा काही पदार्थ का खायचे नाहीत? याचे उत्तर आपल्याकडे नसते. पण इतरांनी सांगितलंय म्हणून गरोदर महिला ते पदार्थ खाणे टाळतात आणि त्यामुळे त्या पदार्थातील पोषक तत्व त्यांना मिळत नाहीत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑक्टोबर : गर्भवती महिलेला आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे तिच्या आहारात कोणत्या गोष्टी असाव्या कोणत्या त्या असू नये. याबद्दल सर्वजण जागरूक असतात. सर्वजण मिळून गरोदर महिलेलची काळजी घेतात. यादरम्यान अशा बऱ्याच गोष्टी असतात. ज्याबद्दल गरोदर महिलेला सांगितले जाते की, तिने त्या खाऊ नये. बऱ्याचदा काही पदार्थ का खायचे नाहीत? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? याची उत्तर आपल्याकडे नसतात. पण इतरांनी सांगितलंय म्हणून गरोदर महिला ते पदार्थ खाणे टाळतात आणि त्यामुळे त्या पदार्थातील पोषक तत्व त्यांना मिळत नाहीत. असाच एक पदार्थ म्हणजे भात. गरोदर महिलांनी भात खावा की नाही ? त्याचे काही दुष्परिणाम होतात का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. Abortion Day : कधी करू शकतो गर्भपात; अबॉर्शनसाठी कोणती पद्धत असते सुरक्षित? गरोदरपणात भात खावा की नाही? E Times ने सिलेल्या माहितीनुसार, गरोदरपणात भात खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र तज्ञांनी भात नियंत्रित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला आहे. कारण जास्त प्रमाणात भात खाल्यास वजन वाढू शकते. परंतु त्याचबरोबर दैनंदिन आहारात तांदळाचा समावेश करणे खूप चांगले आहे. कारण त्यात मॅग्नेशियमसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश आहे, जे बाळाच्या चांगल्या संज्ञानात्मक विकासास मदत करते आणि आईच्या आरोग्यास याचा फायदा होतो.

कोणता तांदूळ खावा पांढरा की तपकिरी? पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ दोन्ही गर्भवती मातांसाठी उत्तम आहेत, याचे कारण म्हणजे तांदूळ नैसर्गिकरित्या कॅल्शियम, फायबर्स, रिबोफ्लेविन, थायामिन आणि व्हिटॅमिन डी मध्ये समृद्ध आहे, जे संपूर्ण प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर तांदळातील निरोगी कार्बोहायड्रेट्स पुरेशी ऊर्जा देण्यास मदत करते.

गरोदर महिलांनी नवरात्रीचे उपवास करताना घ्या विशेष काळजी, या गोष्टींकडे करू नये दुर्लक्ष

संबंधित बातम्या

गरोदरपणात तपकिरी तांदळाचे सेवन केल्याने पचन चांगले होते आणि गर्भधारणेमुळे होणार्‍या बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. कारण तांदळात मोठ्या प्रमाणावर सोल्युबल फायबर असतात. त्याचबरोबर तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे, ते प्रमाणात खाल्यास इंसुलिनचे नियंत्रित राहण्यास मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या