पाळीदरम्यान अजिबात करू नये या चुका
मुंबई, 19 नोव्हेंबर : मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, पाय दुखणे, काहीवेळा मळमळ आणि अंथरुणाचा वास येणे या समस्यादेखील येतात. तसेच जास्त रक्तस्त्राव, निद्रानाश, डोकेदुखी यांसारख्या समस्याही आहेतच. मात्र पिरीएड्स दरम्यान आपण करत असलेल्या काही गोष्टी आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणून आपल्या या चुकीच्या सवयी बदलणे आवश्यक असते. डॉक्टरांच्या मते असुरक्षित पॅड्स, खाण्याच्या सवयींमुळे महिलांना या समस्या उद्भवू शकतात. खरं तर मासिक पाळीदरम्यानची पोटदुखी आणि अंथरुणाचा वास यापासून सुटका मिळवण्यासाठी ती महिला काही चुकीच्या पद्धतीचा अवलंबकरतात, जे त्यांना तात्काळ आराम देतात, पण भविष्यात त्यांच्या आरोग्या ला यामुळे नुकसान पोहोचू शकते. चला जाणून घेऊया मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणत्या गोष्टी करणे टाळावे.
वाढत्या वयासोबत मासिक पाळीत होतात हे मोठे बदल, या संकेतांकडे करू नका दुर्लक्षपेन किलर खाणे मासिक पाळीच्या काळात बहुतेक महिलांना पोटदुखीची समस्या असते. ज्यामध्ये काहीवेळा असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. यातून लगेच सुटका होण्यासाठी महिला पेन किलरची मदत घेतात. हे पेन किलर त्यांना तात्काळ आराम देतात, परंतु भविष्यात त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, मासिक पाळी दरम्यान घेतलेले वेदनाशामक खूप हानिकारक असतात. ते शरीरातील चांगले बॅक्टेरिया काढून टाकतात. यामुळे भविष्यात किडनी, लिव्हर आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच पेन किलर घेणे टाळावे.
परफ्यूम वापरणे मासिक पाळीत येणारा दुर्गंधी लपविण्यासाठी अनेक महिला विविध प्रकारचे परफ्यूम वापरतात. यामुळे काही काळ वासापासून सुटका मिळते, परंतु ते तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असू शकते. परफ्यूममध्ये अनेक प्रकारची रसायने असतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेला संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही हे करणे टाळावे. जास्त प्रमाणात कॉफी पिणे मासिक पाळीच्या काळात अनेक महिला वेदनांमुळे कॉफीचा आधार घेतात. परंतु असे केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, कारण कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीराला डिहायड्रेट करते. म्हणूनच मासिक पाळी दरम्यान जास्त कॉफी पिऊ नका.
Excercise during Period : मासिक पाळीच्या प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम; त्या दिवसात करा ‘हा’ व्यायामएकच सॅनिटरी नॅपकिन जास्त वेळ वापरणे मासिक पाळीच्या काळात महिला एकच सॅनिटरी नॅपकिन बराच वेळ वापरत असतात. यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्याने, हवेचे परिसंचरण आधीच खूप कमी झालेले असते. अशा स्थितीत एकच नॅपकिन दीर्घकाळ वापरल्याने बॅक्टेरिया वाढू लागतात, जे अॅलर्जी किंवा संसर्गाचे कारण बनू शकतात. म्हणूनच दर तीन तासांनी नॅपकिन बदलावे.