JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Heart Disease Risk: या रक्त गटाच्या लोकांना Heart attack चा जास्त धोका; चुकीच्या सवयी वेळीच सोडा

Heart Disease Risk: या रक्त गटाच्या लोकांना Heart attack चा जास्त धोका; चुकीच्या सवयी वेळीच सोडा

कोणत्या रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो आणि कोणत्या रक्तगटाचे लोक यापासून जास्त सुरक्षित असतात, याविषयी (Heart attack tips) जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 एप्रिल : बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. धावपळीच्या आणि व्यग्र जीवनशैलीत आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे अनेकांना फार कमी वयातच हृदयविकाराचा झटका (Heart Disease Risk) येतो. या आजाराने बहुतेक लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. कोणत्या रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो आणि कोणत्या रक्तगटाचे लोक यापासून जास्त सुरक्षित असतात, याविषयी (Heart attack tips) जाणून घेऊया. A आणि B ला हृदयविकाराचा सर्वाधिक धोका झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की A आणि B रक्तगट असलेल्या लोकांना थ्रोम्बोसिसचा धोका जास्त असतो. थ्रोम्बोसिस, रक्ताच्या धमन्या किंवा शिरामध्ये क्लॉटिंग नावाची स्थिती, गुठळ्या तयार झाल्यामुळे, हृदयाला रक्त पंप करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, ज्यामुळे अनेक रोगांचा धोका वाढू शकतो. O रक्तगटाच्या बाबतीत - याशिवाय ओ रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. मात्र, या दाव्याला आत्तापर्यत कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ओ रक्तगटाच्या लोकांना धोका कमी असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. हे वाचा -  Shocking! एनर्जी ड्रिंक पिताच 6 वर्षीय मुलाला आला हार्ट अटॅक; चिमुकल्याचा मृत्यू या सवयी लगेच बदला - निरोगी राहण्यासाठी सर्वात आधी झोपण्याची आणि वेळेवर उठण्याची सवय लावून घ्या. कारण तुमची ही सवय तुम्हाला अनेक आजार होण्यापासून वाचवेल. यासोबतच तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यावे लागेल. जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांचा, कच्चा पदार्थांचा (सॅलाड) आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होईल. हे वाचा -  World Malaria Day: मलेरिया जीवघेणा ठरू शकतो; आयुर्वेदिक उपचारांनी अशी घ्या काळजी (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या