JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Optical Illusion: शेतात लपलेली मांजर अवघ्या 7 सेकंदात शोधली तर तुम्ही 'जीनियस'

Optical Illusion: शेतात लपलेली मांजर अवघ्या 7 सेकंदात शोधली तर तुम्ही 'जीनियस'

Optical Illusion: लपलेली मांजर शोधून तुमच्या मेंदूची ऑप्टिकल इल्युजन चाचणी करा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 ऑक्टोबर : आपल्यापैकी अनेकांची सोशल मीडियावर अकाउंट्स असतील. दिवसातला बराचसा वेळ अनेक जण विविध सोशल मीडिया साइट्सवर घालवतात. काहींना तर जवळपास त्याचं व्यसन लागल्यासारखंच आहे. दिवसभर ते सोशल मीडियावर असतात. कारण सध्याच्या काळात सोशल मीडिया हा टाइमपासचा मुख्य पर्याय बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या गमतीशीर व्हिडिओजसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज्, रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे फोटो या ठिकाणी व्हायरल होतात. असे गोंधळात टाकणारे रिडल्स आणि लॉजिकल रीझनिंगशी संबंधित प्रश्न सोडवायला अनेकांना आवडतात. सध्या असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो एका शेतामध्ये दडून बसलेल्या मांजराचा आहे. सात सेकंदांमध्ये या फोटोतलं मांजर शोधून दाखवण्याचं चॅलेंज नेटिझन्सना देण्यात आलं आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मांजर हा पाळीव प्राणी आवडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जगातल्या सर्वांत जास्त मागणी असलेल्या पाळीव प्राण्यांमध्ये मांजरींचा समावेश होतो. परंतु, मांजरं जितकी गोंडस असतात तितकीच ती खोडकरही असतात. या ठिकाणी दिलेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्येही असंच एक मांजर दडून बसलेलं आहे. सात सेकंदांमध्ये हे मांजर शोधून काढणं फार कठीण आहे. वाचा - कपड्यांशिवायच रॅम्पवर आली मॉडेल बेला, शरीरावर स्प्रेने साकारला ड्रेस; LIVE VIDEO अनेकदा आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी या वरून वेगळ्या असतात आणि त्यांचं खरं रूप काही वेगळंच असतं. सत्य शोधण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा खोलवर अभ्यास करावा लागतो. लक्ष केंद्रित करावं. काळजीपूर्वक विचार करावा लागतो. या ठिकाणी दिलेलं ऑप्टिकल इल्युजनही असंच आहे. चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास त्यात दडलेलं मांजर सहज दिसेल. हे मांजर आणि आसपासच्या परिसराचा रंग एकदम सारखा आहे. त्यामुळे ते सहजासहजी नजरेत येत नाही. काळजीपूर्वक बघितल्यास शेताच्या कडेला असलेल्या दगडांच्या जवळ तुम्हाला हे मांजर बसलेलं दिसेल.

ऑप्टिकल इल्युजन्स हा अवयवांचा मेंदूशी समन्वय वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यांच्या मदतीनं मानसिक व्यायाम होतो. खरं तर अशी रीडल्स किंवा ऑप्टिकल इल्युजन्स लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी वापरली जातात; मात्र सोशल मीडियामुळे सध्या लहान मुलांसोबतच मोठ्यांचंदेखील चांगलं मनोरंजन या माध्यमातून होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या