नवी दिल्ली, 11 एप्रिल : घामाला येणाऱ्या वासांमुळे (Body Odder), शरीरातून घाम (Sweating) बाहेर आला नाही तर बरं होईल असं बर्याच जणांना वाटतं. घामाच्या दुर्गंधीमुळे लाज वाटत असली तरी घाम येणं चांगलं असतं. उन्हाळ्याच्या दिवसात तर सगळ्यांनाच घाम (Sweating in summer) येतो. पण, काहींना बाराही महिने घाम येतो. तर, काहींना अगदी कमी घाम येतो. अनेक लोकांना असं वाटतं, की शरीरातून घाम येऊ नये. कारण घामाच्या वासामुळे, बर्याच वेळा लोकांबरोबर वावरताना लाज वाटते. पण अंगाला घाम येणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits Of Sweating) आहे. आज जाणून घेऊयात घाम येण्याचे याचे फायदे. शरीरातून अपायकारक पदार्थ बाहेर फेकले जातात आवडत नसलं तरी, घाम येणं आरोग्यासाठी चांगलं आहे. घामामुळे शरीर डिटॉक्सिफाय होतं, म्हणजेच घामाने शरीरातून अपायकारक पदार्थ आणि विषारी घटक बाहेर पडतात. घाम फुटल्यानं शरीराचं तापमान योग्य राहतं. रासायनिक पदार्थ काढून टाकतं शरीरात अनेक प्रकारचे रसायनिक पदार्थ असतात, जे आरोग्यावर वाईट परिणाम करतात. घामामुळे शरीरातून हे रसायनिक पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे आरोग्याच्या समस्या कमी होतात. नैसर्गिक चमक येते - घामामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन (blood circulation) वाढतं. त्यामुळे त्वचेची चमक वाढते. घाम निघून गेल्यावर त्वचा कोमल बनते. कॅलरीज कमी होतात - घामामुळे कॅलरी बर्न होतात, ज्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. पण, कॅलरी बर्न करण्यासाठी जास्त घाम यावा लागतो. यासाठी व्यायाम किंवा कष्टाची कामं करावी लागतात. हे वाचा - चहा प्यायल्यानंतर कधीही लगेच या गोष्टी खाऊ नयेत; वेगळेच त्रास सुरू होतात तणाव कमी होतो - घाम येण्याने तणावातून आराम मिळतो. स्ट्रेस वाढला असेल तर, व्यायाम करावा. त्यामुळे शरीरावर घाम येतो. घामामुळे शरीराची उष्णता कमी होते,ज्यामुळं तणाव कमी होण्यात मदत होते. हे वाचा - व्यायाम करूनही Belly Fat होत नाही कमी? या टिप्स वापरून बघा; दिसू लागेल परिणाम (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)