नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : गेल्या काही आठवड्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ इंटरनेटवर समोर आले आहेत. कुणाचा नाचताना, कुणाचा दांडिया खेळताना, तर कुठे रामलीलाच्या स्टेजवरच कलाकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हे व्हिडिओ पाहून कुणाला धक्का बसू शकतो. हे देखील लक्षात येतं की कुणालाही हार्ट अटॅक येऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लोकांना आपण मृत्यूच्या किती जवळ आलो आहोत, याचा थोडासाही थांगपत्ता नव्हता. हृदयविकाराचा झटका लोकांना अचानक मृत्यूच्या जाळ्यात ओढत आहे. तज्ज्ञांच्या मते, सावधगिरी बाळगून लोक असे मृत्यू टाळू शकतात. यासाठी हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. असे चालता-बोलता हार्ट अटॅक का येत आहेत? अपोलो हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजिस्ट डॉ.वनिता अरोरा यांच्या मते, आजच्या युगात तरुणांनाही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि अति ताण. धूम्रपान, मद्यपान, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि कोणतीही शारीरिक हालचाल न करणे ही देखील हृदयविकाराची प्रमुख कारणे आहेत. मोठ्या संख्येने तरुण बॉडी बनवण्यासाठी सप्लिमेंट्स घेतात, जे हृदयासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो. अतिव्यायाम आणि नृत्यामुळेही हृदयावर दाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
जाणून घ्या हार्ट अटॅकची मुख्य लक्षणे - - छातीत अचानक दुखणे - छातीत दुखताना जबड्यापर्यंत वेदना - छातीत जडपणाची भावना - अचानक हृदयाचे ठोके वाढणे - दम लागणे - अचानक जास्त घाम येणे - थकवा, ऊर्जा कमी होणे किंवा मूर्च्छा येणे हे वाचा - डायबेटिजला रोखण्याचा सोपा मार्ग; लक्षणं दिसताच त्वरित करा हे 5 उपाय प्रत्येकासाठी हृदय तपासणी आवश्यक आहे का? हृदयरोगतज्ज्ञ डॉ.वनिता अरोरा सांगतात की, आजच्या युगात सर्व वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. सर्व लोकांनी वेळोवेळी हृदय तपासणी करून घ्यावी. याशिवाय जिममध्ये जाण्यापूर्वी हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. याशिवाय सर्व लोकांना झोपण्याची आणि उठण्याची योग्य वेळ ठरवावी लागते. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. जंक फूड टाळावे लागते. तणावाचे व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. दररोज 40 मिनिटांत किमान 4 किमी चालले पाहिजे. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहणे फायदेशीर आहे.