JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Neck Rashes Remedy : बाळाच्या मानेवर वारंवार येतात पुरळ? मग करून पाहा हे 5 घरगुती उपाय

Neck Rashes Remedy : बाळाच्या मानेवर वारंवार येतात पुरळ? मग करून पाहा हे 5 घरगुती उपाय

पावसाळ्यातील उष्णता आणि आर्द्रतेमुळे मानेवर किंवा पाठीवर पुरळ उठतात. घाम किंवा घाण यामुळे बाळाच्या मानेवर सूज, खाज, वेदना आणि लालसरपणा देखील येऊ शकतो.

जाहिरात

पुरळांवर घरगुती उपाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 सप्टेंबर : उष्णतेमुळे अनेकदा लहान बाळाच्या मानेवर पुरळ उठतात आणि त्यात जळजळ झाल्यामुळे त्यांना रात्री शांत झोप लागत नाही. पावसाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.ओन्लीमायहेल्थनुसार लहान मुलांची त्वचा खूप मऊ असते. त्यामुळे पावसाळ्यातील उष्णता आणि आर्द्रतेमुळे मानेवर किंवा पाठीवर पुरळ उठतात. घाम किंवा घाण यामुळे बाळाच्या मानेवर सूज, खाज, वेदना आणि लालसरपणा देखील येऊ शकतो. अशी समस्या असेल तेव्हा लोक अनेकदा त्यावर पावडर लावतात. परंतु असे केल्याने समस्या आणखी वाढू शकते. लहान मुलांच्या मानेवर पुरळ येण्याच्या समस्येवर तुम्ही घरगुती पद्धतीने कसा उपचार करू शकता हे आज जाणून घेऊया. लहान मुलांमधील पुरळ बरे करण्यासाठी 4 घरगुती उपाय खोबरेल तेल : नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते, जे त्वचेवर पुरळ उठण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. मुलांच्या त्वचेसाठी हे तेल खूप माइल्ड असते. तुम्ही कापसाच्या मदतीने बाळाच्या मानेवर खोबरेल तेल लावू शकता. तेल लावल्यानंतर 15 मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.

मुलांचं अंगठा चोखणं पडू शकतं महागात; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती

संबंधित बातम्या

कोल्ड कॉम्प्रेस : ​​मानेवर किंवा शरीरात कुठेही पुरळ उठले असेल तर तुम्ही कोल्ड कॉम्प्रेसच्या मदतीने ते बरे करू शकता. कोल्ड कॉम्प्रेस केल्याने सूज कमी होईल आणि आरामही मिळेल. कॉम्प्रेस करण्यासाठी तुम्ही थेट मुलाच्या त्वचेवर बर्फ लावू शकत नाही. यासाठी एका भांड्यात थंड पाणी आणि बर्फ एकत्र करून टॉवेल बुडवून घ्या आणि तो बाळाच्या त्वचेवर लावा. मध : मधामध्ये अँटीमाइक्रोब‍ियल गुणधर्म असतात, जे पुरळांवर उपचार करण्यासाठी रामबाण उपाय आहेत. यासाठी एक चमचा मधात बदामाचे तेल घालून बाळाच्या त्वचेवर लावा. 15 मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा आणि अँटीबैक्टीरियल क्रीम लावा. हे बाळाच्या त्वचेसाठी सुरक्षित असते. तुमच्याही डोळ्यांखाली सूज आहे का? दूर करण्यासाठी करा हे उपाय कडुलिंबाचे तेल : कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्वचेतून बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग काढून टाकण्यासाठी तुम्ही ते बाळाच्या त्वचेवर लावू शकता. हे तेल लावल्यानंतर15 मिनिटांनी त्वचा पुसून घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या