JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कॅन्सर प्राणघातक आहे..! कमी वयातच या गोष्टींची काळजी घेतली तर टेन्शन फ्री राहाल

कॅन्सर प्राणघातक आहे..! कमी वयातच या गोष्टींची काळजी घेतली तर टेन्शन फ्री राहाल

कॅन्सर हा आजच्या युगातील सर्वात प्राणघातक आजार आहे आणि त्यातून बरं होणं हे एक मोठे आव्हान आहे. प्रचंड आधुनिक वैद्यकीय स्थिती सध्या असून आजही आपण कर्करोगावर पूर्ण उपचार शोधू शकलेलो नाही.

जाहिरात

कॅन्सर टाळण्याचे उपाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : कॅन्सर! हा असा एक शब्द आहे, तो झालाय असं म्हणताच अनेकांना पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटते. कॅन्सर हा आजच्या युगातील सर्वात प्राणघातक आजार आहे आणि त्यातून बरं होणं हे एक मोठे आव्हान आहे. प्रचंड आधुनिक वैद्यकीय स्थिती सध्या असून आजही आपण कर्करोगावर पूर्ण उपचार शोधू शकलेलो नाही. आज ज्या पद्धतीने आपल्या खाण्यापिण्यात, जीवनशैलीत, आपली दिनचर्या, आपली कामाची पद्धत बदलत चालली आहे, त्याचा परिणाम कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आपल्या सवयी आणि रोजच्या जीवनशैलीत सुधारणा करून आपण कॅन्सरला बऱ्याच अंशी टाळू शकतो. यासाठी आधी कॅन्सर म्हणजे काय ते समजून घेणे गरजेचे आहे. कर्करोग कसा पसरतो - अमेरिकन कॅन्सर इन्स्टिट्यूट च्या माहितीनुसार, पेशींची अनियंत्रित आणि अव्यवस्थित वाढ किंवा प्रसार हा कर्करोगाचे कारण आहे. वास्तविक, कर्करोग पेशींच्या डीएनएला नुकसान पोहोचवतो. पेशींच्या कार्याचा आणि वाढीचा कोड डीएनएमध्ये लपलेला असतो. पण डीएनए खराब झाल्यामुळे पेशी अनियंत्रित होतात आणि अनियंत्रितपणे वाढू लागतात. ही वाढ ट्यूमरच्या रूपात दिसू लागते. मात्र, सगळेच ट्यूमर हे कर्करोगाचे ट्यूमर नसतात.

कॅन्सर कसा होतो - कॅन्सरमध्ये पेशींच्या डीएनएचे नुकसान होत असते. आता प्रश्न पडतो की, हा डीएनए खराब कसा काय होतो? अनेक प्रकारची पर्यावरणीय कारणे, तंबाखूमध्ये असलेली रसायने, सूर्याची अतिनील किरणे, अन्नातील विषारी रसायने, किरणोत्सर्ग, संसर्गजन्य घटक, अल्कोहोलमध्ये असलेली रसायने, बेंझिन, एस्बेस्टोस, आर्सेनिक, बेरिलियम, निकेल, इ. गोष्टी कॅन्स होण्यासाठी कारणीभूत आहेत. कॅन्सर कसा टाळता येईल - Cancer.org वेबसाइटच्या माहितीनुसार, लहानपणापासून काही सवयी बदलल्या तर कॅन्सरचा धोका खूप कमी होतो. किरणोत्सर्ग (रेडिएशन) - किरणोत्सर्ग कर्करोगासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. शक्यतो रेडिएशनच्या प्रभावाखाली येऊ नका. धूम्रपान, अल्कोहोलपासून दूर राहणे- सध्याच्या बहुतांश कर्करोगांसाठी धूम्रपान किंवा मद्यपान जबाबदार आहे. त्यामुळे या दोन्हींपासून अंतर ठेवा. वजन नियंत्रित ठेवा - वाढत्या वजनामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. कर्करोग देखील यापैकी एक आहे. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवा आणि शरीर अ‌ॅक्टिव ठेवा. सूर्यप्रकाश - सूर्यप्रकाश शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु जास्त सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. याशिवाय टॅनिंग सॅलून करणे टाळा. सेक्स कंट्रोल - ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे. एचपीव्हीमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. हा प्रकार पुरुषांमध्ये देखील होऊ शकतो. असुरक्षित संभोग आणि एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत शरीरसंबंध ठेवल्यामुळे या प्रकारच्या कर्करोगाचा धोका असतो. नियमित तपासणी करा- महिलांना वयाच्या 25 वर्षांनंतर दर एक ते दोन वर्षांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी पॅप स्मीअर चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे कोलन कॅन्सरसाठीही कोलोनोस्कोपी केली जाते. 45 वर्षांनंतर पुरुषांनी कोलन कॅन्सरची सतत चाचणी केली पाहिजे. या प्रकारचे कर्करोग प्राथमिक अवस्थेत आढळल्यास त्यावर उपचार करता येतात. लस - APV ची लस आली आहे. 9 ते 11 वयोगटातील मुलींना ही लस द्यावी. जरी 13 ते 26 वर्षांपर्यंत लस घेतली नसली तरी ती घेता येते. याशिवाय हिपॅटायटीस बीसाठी लसीकरण करा. हे वाचा -  वडिलांशी बोलताना या गोष्टींचे नेहमी भान ठेवा, तुमचे हे शब्द त्यांचे मन दुखावतात नियमित व्यायाम- नियमित व्यायामाने अनेक आजारांपासून दूर राहता येते. व्यायामामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, फ्लॉवर, गाजर, बीन्स, बेरी, दालचिनी, बदाम, ऑलिव्ह ऑईल, हळद, लिंबूवर्गीय फळे, फ्लेक्ससीड्स, भोपळ्याच्या बिया, टोमॅटो, लसूण, ऑयली फिश इत्यादींमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. या गोष्टी खा. याशिवाय जंक फूड आणि सॅच्युरेटेड फूड आहारातून काढून टाका. हंगामी हिरव्या भाज्या खाणे चांगले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या