मुंबई 30 ऑगस्ट : वयाची तिशी ओलाडल्यानंतर किंवा 35 पेक्षा जास्त वय झाल्यानंतर आयुष्यातील अनेक गोष्टी आपोआप बदलतात. बहुतेकांची लाईफस्टाईल अगदी पूर्णपणे बदलून जाते. पहाटेच्या जॉगिंगची जागा रात्री उशिरा जिम घेते. यासोबतच तुमचं सामाजिक आयुष्यही बरंच बदलतं. कारण तुमचे सहकारी तुमचे मित्र बनतात आणि तुमचे जुने चांगल्या मित्रांसोबतचा संपर्क हळूहळू कमी होत जातात. याला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या जिवलग मित्रांसोबत आयुष्यभर लक्षात राहील अशा ठिकाणी फिरण्यासाठी ट्रीप अरेंज करणं. तर, पाहूया 35 वर्षाचं होण्यापूर्वी फिरावी अशी भारतातील काही सर्वोत्तम ठिकाणे.
गोवा - द पार्टी पॅराडाईज गोव्याचा नुसता उल्लेख प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. हे छोटंसं राज्य देशातील पार्टीसाठीचं सर्वोत्तम ठिकाण आहे. गोव्यात वर्षभराच्या पार्टीच्या दृश्याव्यतिरिक्त तुम्ही वॅगेटर येथे बनाना बोट चालवू शकता किंवा त्याहूनही चांगलं म्हणजे कलंगुट येथे पॅराग्लाइड करू शकता. गोवा हे भारतातील असं ठिकाण आहे, जिथे आयुष्यात एकदा तरी भेट देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक तरुणाच्या आणि मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठीच्या ठिकाणांच्या यादीत गोवा नेहमीच पहिल्या स्थानी असतं. गोव्यात जाण्यासाठी फ्लाईट तिकिट आणि हॉटेल बुकिंग हे थोडं कठीण आहे, विशेषतः पीक सीझनमध्ये. त्यामुळे इथे फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमचे तिकीट आधीच बूक करा. लडाख - तुमच्या मित्रांसोबत बाईकवरून लडाखला जाणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. परंतु सावधगिरी बाळगा कारण ही रोड ट्रिप तुम्हाला शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीच्या मर्यादेच्या पूर्ण टोकापर्यंत ढकलेल. लडाख त्याच्या अनेक सुंदर ठिकाणांसाठी आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहे. हे भारतातील भेट देण्यासारख्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तुमच्याकडे तिथे घालवण्यासाठी फक्त एक दिवस असला तरी श्रीनगरला नक्की जा. दल सरोवरात बोटहाऊसवर एक रात्र घालवा आणि सकाळी इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डनला भेट द्या. धर्मशाला हिमाचल प्रदेशातील धर्मशाला हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. याशिवाय, इथे पर्यटकांसाठी अनेक खास ऑफर्सही असतात. तुम्ही हँग-ग्लाइड करू शकता, ट्रेक करू शकता, कॅम्प करू शकता आणि भाड्याने दुचाकी घेऊन मोटरसायकल टूर करून पाहू शकता. मनाली - मनालीमध्ये खाण्याची, पाहण्याची आणि राहण्याची ठिकाणे भरपूर आहेत. हे भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथे तुम्ही गरम पाण्याच्या झऱ्यात आंघोळ करू शकता आणि भारतातील सर्वात मोठ्या वन्यजीव अभयारण्यांपैकी एकाला भेट देऊ शकता.