JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळी वातावरणातही स्कीन राहील एक्स्ट्रा ग्लोईंग; एक्सपर्ट्सने सांगितल्या या सोप्या टिप्स

पावसाळी वातावरणातही स्कीन राहील एक्स्ट्रा ग्लोईंग; एक्सपर्ट्सने सांगितल्या या सोप्या टिप्स

त्वचाशास्त्रज्ज्ञ डॉ. युगल राजपूत (एमडी) यांनी पावसाळी वातावरणामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्या, याविषयी माहिती दिली आहे. पावसाळ्यात होणारे स्कीन प्रॉब्लेम टाळण्यासाठी या टिप्स उपयोगी येतील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर : बहुतेक लोकांना पावसाळ्यात फिरायला आवडतं. काहीवेळा हवामान खूप आल्हाददायक होतं आणि लोक हवामानाचा आनंद घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. लोकांना पावसाळ्याचा आनंद लुटायचा असतो, सध्या पावसाळा संपत आला असला तरी संपूर्ण राज्यात पावसाळी वातावरण आहे. या वातावरणात अनेक वेळा त्वचेच्या अनेक समस्या समोर येतात. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने त्वचेची चमक टिकवून ठेवणे कठीण होते. विशेषत: तेलकट आणि सन्सेटिव त्वचा असलेल्या लोकांनी या काळात त्यांच्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पावसात त्वचेच्या या समस्या उद्भवतात - त्वचाशास्त्रज्ज्ञ डॉ. युगल राजपूत (एमडी) यांच्या मते, पावसाळ्यात आपल्याला घामही येतो आणि वातावरणात ओलावाही असतो. यामुळे लोकांना त्वचेच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. आर्द्रता आणि घामामुळे शरीराच्या अनेक भागांवर बुरशीजन्य संसर्ग, डाग, घामुळे, एक्जिमा किंवा ऍलर्जी होते. याशिवाय चेहऱ्यावर मुरुम येतात आणि केस गळतीही सुरू होते. पावसाचे घाण पाणी आणि धूळ हे देखील याचे कारण असू शकते. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर त्वचा स्वच्छ करावी. हे वाचा -  ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा - या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. युगल राजपूत सांगतात. पावसात भिजत असाल तर घरी आल्यावर लवकरात लवकर ओले कपडे काढून स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी. आंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावा. यामुळे ओलावा कमी होतो. मुरुमे होऊ नयेत म्हणून दिवसातून दोनदा फेसवॉशने चेहरा धुवावा आणि मॉइश्चरायझरचा वापर करा. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी अँटीफंगल डस्टिंग पावडरचा वापर केला जाऊ शकतो. केसगळती टाळण्यासाठी शॅम्पूनंतर कंडिशनरचा वापर करता येईल. हे वाचा -  नाक, तोंड नाही तर शरीराच्या ‘या’ अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा आहाराचा त्वचेवर चांगला परिणाम होतो - तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात त्वचा ग्लोईंग आणि चमकदार ठेवण्यासाठी दररोज 4 ते 5 लिटर पाणी प्यावे. आहारात हंगामी फळांचा समावेश करावा. फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. याशिवाय जंक फूड टाळावे. बर्‍याच वेळा जंक फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर केला जातो, ज्यामुळे मुरुमे आणि ऍलर्जीची समस्या वाढू शकते. मुरुमांचा त्रास होत असेल तर आपल्याला विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या