घड्याळाची दिशा - वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य ठिकाणी घड्याळ लावले नसेल तर जीवनात अनेक आर्थिक समस्या येतात. वास्तूनुसार घरामध्ये घड्याळ कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये. घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं चांगलं मानलं जातं.
मुंबई, 05 मे : वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी आणि लावण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसार त्या शुभ आणि फलदायी ठरतात. प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला, योग्य ठिकाणी ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते. अशाच पद्धतीनं घराच्या भिंतीवरील घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम सांगण्यात आले (Clock Vastu Tips) आहेत. घराच्या भिंतीवरील घड्याळ केवळ वेळच सांगत नाही, तर अनेक शुभ आणि अशुभ संकेतही देते. वास्तू नियमांनुसार घड्याळाचा वापर चुकीच्या पद्धतीने झाल्यास आपले नुकसान होते. घड्याळाचा जीवनावर परिणाम होतो. घरातील बंद पडलेलं घड्याळ नकारात्मकता पसरवते. तसेच घरही घड्याळासारखे निर्जीव होते. घड्याळाबाबत वास्तुशास्त्राचे नियम जाणून घेऊया. वास्तूनुसार घड्याळासोबत या गोष्टी लक्षात ठेवा बंद घड्याळ अशुभ - वास्तु तज्ज्ञांच्या मते, बंद घड्याळ हे अशुभतेचे सूचक आहे. ज्या घरात घड्याळ बंद ठेवले जाते, त्या घरात रोगांचा वावर सुरू होतो. पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. यासोबतच घरात नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नका. घड्याळाशी संबंधित काही खास गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा वाईट काळही चांगल्यामध्ये बदलू शकतो. हे वाचा - तापलेल्या तव्यावर पाणी यासाठी ओतायचं नसतं; वास्तुशास्त्रात सांगितलेत या गोष्टी दक्षिण दिशेला घड्याळ लावू नका - वास्तूनुसार घराची दक्षिण दिशा ही स्थिरतेची दिशा असते. या दिशेला घड्याळ लावल्याने तुमच्या घराची प्रगती थांबू शकते. यासोबतच असे मानले जाते की, या दिशेला घड्याळ लावल्याने घरातील प्रमुखाचे आरोग्य बिघडू लागते. तसेच उधळपट्टीही वाढू लागते. त्यामुळे घरात अनेक समस्या वाढू लागतात आणि नकारात्मक वातावरण तयार होते. घराच्या दक्षिण दिशेला यमाची दिशा म्हणतात, त्यामुळे या कोपऱ्यात घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती थांबते. हे वाचा - शुगर कंट्रोलपासून वजन कमी करण्यापर्यंत शेवग्याची पानं वरदान! अशा पद्धतीनं वापरा दारावर घड्याळ लावू नका - असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीने घराच्या दारावर घड्याळ लावले तर त्याच्या कामात ताण-तणाव वाढू शकतो. यामुळे त्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्याचवेळी वास्तूनुसार अशा ठिकाणी घड्याळ लावणे टाळावे की, आत प्रवेश करताच लोकांची नजर घड्याळावर पडेल. हे अशुभ मानले जाते.