JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात कधी आहेत मुहूर्त? येथे जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्तांची यादी

मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात कधी आहेत मुहूर्त? येथे जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्तांची यादी

सध्या लग्नसराई सुरू असल्याने सर्वत्र धावपळीचे वातावरण आहे. मे महिना अंतिम टप्प्यात असून शेवटच्या आठवड्यात कोणते मुहूर्त आहेत पाहुयात. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून या आठवड्याच्या शुभ मुहूर्तांबद्दल जाणून घेतले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मे : चौथ्या आठवड्यात (मे 2022) लग्न, मुंडण, गृहप्रवेश इत्यादीसाठी काही शुभ मुहूर्त आहेत. मे महिन्याचा चौथा आठवडा रविवार 22 मे पासून सुरू झाला असून शनिवार, 28 मे पर्यंत कोणते मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया. या सप्ताहात लग्नासाठी केवळ दोन दिवस शुभ आहेत, त्याचप्रमाणे गृहप्रवेशासाठीही दोन दिवस शुभ मुहूर्त आहेत. या आठवड्याचे शेवटचे दोन दिवस मुंडनासाठी शुभ मुहूर्त आहेत. या आठवड्यात तुम्हाला कोणतीही शुभ कार्ये करायची असतील तर शुभ मुहूर्ताची यादी पाहून घ्या. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून या आठवड्याच्या शुभ मुहूर्तांबद्दल जाणून घेतले आहे. मे 2022 च्या चौथ्या आठवड्यातील शुभ मुहूर्त - गृह प्रवेश मुहूर्त मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात दोन दिवस गृहप्रवेशासाठी शुभ आहेत. जर तुम्हाला तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश करायचा असेल, तर तुम्ही 25 मे ते 26 मे दरम्यान कोणताही एक दिवस निवडू शकता. हे दोन्ही दिवस शुभ मुहूर्त आहेत. 25 मे, दिवस: बुधवार, वेळ: सकाळी 05:25 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 05:25 26 मे, दिवस: गुरुवार, वेळ: सकाळी 05:25 ते रात्री 10:55 मे 2022 मुंडन मुहूर्त - या आठवड्यात जर तुम्हाला तुमच्या मुलाचे मुंडन करायचे असेल तर 27 मे आणि 28 मे हे दोन दिवस शुभ आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी मुलाचे मुंडण करून घेऊ शकता. मे 2022 खरेदीचा मुहूर्त मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, जर तुम्हाला एखादे वाहन, घर, प्लॉट, फ्लॅट किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा त्यासाठी टोकन मनी म्हणजेच बयाणा भरायचा असेल, तर तुम्ही 24, 25, 26 मे यापैकी कोणताही एक दिवस निवडू शकता. या आठवड्यातील हे तीन दिवस खरेदीसाठी शुभ आहेत. या तीन दिवसात केलेल्या खरेदीवर तुम्हाला फायदा मिळेल. मे 2022 लग्नाचा मुहूर्त - सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या आठवड्यात तुम्हालाही तुमच्या कुटुंबासाठी किंवा ओळखीच्या व्यक्तीसाठी लग्नाचा शुभ मुहूर्त पाहायचा असेल तर तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. या सप्ताहात 26 मे आणि 27 मे हे दोनच दिवस लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत. या दोन दिवसांतून तुम्ही योग्य तो दिवस निवडू शकता. हे वाचा -   Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी मे 2022 नामकरण मुहूर्त - या सप्ताहात जर तुम्हाला तुमच्या मुलाचा नामकरण विधी करायचा असेल तर फक्त एक दिवस शुभ मुहूर्त मिळत आहे. रविवार, 22 मे रोजी मुलाचे नाव ठेवू शकता. तसे, हा दिवस देखील सुट्टीचा आहे, म्हणून तो आपल्यासाठी सोयीचा असू शकतो. हे वाचा -  Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या मे 2022 जनेऊ मुहूर्त या सप्ताहात जनेऊ म्हणजेच उपनयन सोहळ्यासाठी शुभ मुहूर्त नाहीत. (सूचना : येथे दिलेली माहिती संबधित ज्योतिषांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या