मुंबई, 27 मे : चहा (Tea) म्हटलं की अनेकांना मोह आवरत नाही. फक्त सकाळ, संध्याकाळ नाहीत तर दिवसभरात कधीही चहा (Tea lover) दिला तरी त्यांना चालतो. फक्त दिवसाची सुरुवातच नाही तर दिवसाचा शेवटही अनेकांना चहाने करायला आवडते. एक वेळ जेवण नाही दिलं तरी चालेल पण चहा (Chai) मात्र आपल्याला हवा, असं अनेक जण म्हणतात. असे चहाप्रेमी (Chai lover) किंवा टी लव्हर तुम्हीसुद्धा असाल किंवा तुमच्या ओळखीतही असे बरेच असतील. पण सध्या सोशल मीडियावर (Social media viral video) अशा चहाप्रेमीचा व्हिडीओ व्हायरल (Tea lover video) होतो आहे, ज्याला तोडच नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या चहाप्रेमीशी कदाचित कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. खरंतर तुम्ही चहाचे कितीही शौकिन असला तरी हा व्हिडीओ पाहून या व्यक्तीला मात्र हाच खरा चहाप्रेमी असाच टॅग द्याल. नेमकं असं या व्हिडीओत काय आहे ते तुम्हीच पाहा.
व्हि़डीओ पाहू शकता, एका व्यक्तीचा हात धरून पोलीस त्याला खेचत नेत आहेत. त्या व्यक्तीच्या हातात चहा आहे. पोलीस पुढे आणि ही व्यक्ती मागे असं दृश्यं आहे. पोलीस खेचत असतानाही ही व्यक्ती हळूहळू चालताना दिसत आहेत. तिचं पूर्ण लक्ष आपल्याला हातातील चहाच्या कपाकडे आहे. मध्येच ही व्यक्ती हा चहाचा ग्लास आपल्या तोंडाजवळ नेण्याचा प्रयत्नही करते, पण चहा जमिनीवर सांडेल या भीतीने पित नाही. ग्लास तसाच हातात ठेवते. त्याचं लक्ष वारंवार एकदा पोलिसाकडे आणि एकदा त्या चहाच्या कपाकडे जातं. हे वाचा - अरे बापरे! बाळासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला…; पाहा हा VIDEO सामान्यपणे पोलिसांनी पकडल्यानंतर लोक स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करतात किंवा पोलीस दिसताच तिथून पळत सुटतात. पण या तरुणाला मात्र स्वतःपेक्षा चहाचीच जास्त चिंता असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे स्वतःऐवजी तो चहालाच वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे. पोलिसांच्या गाडीत बसेपर्यंत चहाचा एकही थेंड तो जमिनीवर सांडू देत नाही. आयपीएस ऑफिसर अंकिता शर्मा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ये हम है, ये हमारी चाय है, बाकी बाद मे देखेंगे असं मजेशीर कॅप्शन त्यांनी या व्हिडओला दिलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यावर तशाच विनोदी प्रतिक्रियाही येत आहेत. चहा चोरल्याच्या आरोपात अटक अशी कमेंट एका युझरने दिली आहे. तर चहा सांडला नाही पाहिजे जे करायचं आहे ते करा, प्राण जाए पर चाय ना जाए, पुलिस से नहीं, चाय बिखरने से डर लगता है, अशा मजेशीर कमेंट येत आहेत. हे वाचा - VIDEO : लग्नात नवरदेवाने केलं असं काही की आनंदाच्या भरात नाचायला लागली नवरी तर चहाप्रेमींना खऱ्या अर्थाने त्याच्या भावना समजल्या आहेत. त्यांनी या व्यक्तीला दाद दिली आहे. हा खरा चहा शौकिन, चहाप्रेमी आहे, असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.