JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ना कुत्रा, ना मांजर थेट मगरींसहच अंघोळ करण्याची डेअरिंग; VIDEO पाहा मग समजेल पुढे काय झालं

ना कुत्रा, ना मांजर थेट मगरींसहच अंघोळ करण्याची डेअरिंग; VIDEO पाहा मग समजेल पुढे काय झालं

मगरींसह (Crocodile) अंघोळ ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही, ते प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोबर : स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना आपल्या लाडक्या कुत्र्याला, मांजराला घेऊन अंघोळ करण्याची सवय अनेकांना असते. मात्र मगरींसह (Crocodile) अंघोळ केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? ज्या पाण्यात मगर आहे, तिथं कुणाला जायलादेखील दिलं जात नाही. मग समोर पाहिली की अंगाचंही पाणीपाणी होतं. मग अशा मगरींसह कोण बरं अंघोळ करेल, असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तुम्ही-आम्ही कुणीही मगरींसह अंघोळ करण्याची साधी कल्पनाही करू शकत नाही. तशी डेअरिंग एका व्यक्तीने केली. मगरी असलेल्या पाण्यात ही व्यक्ती उतरली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे माहिती नाही. @TheoShantonas या ट्विटर युझरने व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने जस्ट अ टेस्ट असं कॅप्शन दिलं आहे. हे वाचा -  5 लाखांना ऑनलाइन विकत घेतली मांजर, बॉक्स उघडला तर त्यात होता वाघाचा बछडा व्हिडीओत पाहू शकता आधीपासूनच मगरी असलेल्या या पाण्यात ही व्यक्ती आहे. ती अगदी पाण्याच्या मधोमध नाही. मात्र पाण्याच्या किनाऱ्याजवळ आहेत. त्यानंतर दोन मगरी या व्यक्तीच्या जवळ आल्या. या व्यक्तीच्या मनात तशी भीती दिसतेय. मात्र आधी तिला वाटलं मगर आपल्याला काहीच करणार नाही. मगरदेखील अगदी शांतपणे या व्यक्तीच्या जवळ आली. तिने थेट हल्ला केला नाही. जवळ आल्यानंतर आधी हळूच जणू त्या व्यक्तीचा पापा घ्यावा असंच तिनं काही केलं आणि अचानक आपला भला मोठा जबडा उघडून त्या व्यक्तीला आपल्या तोंडात घेण्याचा प्रयत्न केला. हे वाचा -  पकडलं खरं पण आता चलन कशाचं कापायचं? गाडी पाहून वाहतूक पोलिसांनाही पडला प्रश्न व्यक्तीने तात्काळ आपले हातपाय हलवून त्या मगरीला दूर केलं आणि लगेच पाण्याबाहेर आली. ही डेअरिंग त्याच्या जीवावर चांगलीच बेतली असती. सुदैवानं या व्यक्तीसोबत तसं काही झालं नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या